Tuesday, November 5, 2024
Homeराज्यमाणूस जगविण्यासाठी माणुसकीच्या नात्याने केलेले कार्य कौतुकास्पद….

माणूस जगविण्यासाठी माणुसकीच्या नात्याने केलेले कार्य कौतुकास्पद….

  • वनराईचे विश्वस्त डॉ. गिरीश गांधी यांचे प्रतिपादन
  • प्रत्येकाने आपले आरोग्य जपले पाहिजे
    इंटरनॅशनल लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन प्रा.डॉ. थॉमस चेरियन यांचे आवाहन
  • विदर्भस्तरीय यकृत जागृती कार्यक्रमाचा शुभारंभ

शरद नागदेवे

नागपूर : भारतीयांची सरासरी आयुर्मर्यादा दिवसेंदिवस खालावत आहे. बदलती जीवनशैली त्यास कारणीभूत आहे. वैद्यकीय उपचाराच्या भरवशावर माणूस जगत आहे. स्वातंत्र्यानंतर वैद्यकीय विज्ञान क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. माणूस जगविण्यासाठी माणुसकीच्या नात्याने केलेले हे कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन वनराईचे विश्वस्त डॉ. गिरीश गांधी यांनी केले.

साउथ एशियन लिव्हर इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने रोटरी क्लब ऑफ नागपूर एलिटच्या वतीने राष्ट्रभाषा कॉन्फरन्स हॉल, वोक्हार्ट हॉस्पिटलच्या मागे, शंकरनगर, नागपूर येथे शनिवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी विदर्भस्तरीय यकृत जागृती कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा विदर्भचे अध्यक्ष अजय पाटील होते. मंचावर सत्कारमूर्ती प्रा.डॉ. थॉमस चेरियन, रोटरी ईलिट चे अध्यक्ष शुभंकर पाटील यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी डॉ. गिरीश गांधी म्हणाले, डॉ. थॉमस चेरियन यांनी देशातील नागरिकांच्या यकृत उपचारासाठी मोठे पाऊल उचलले आहे. लिव्हरच्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. त्यावर जनजागृती कार्याचा शुभारंभ नागपुरातून होत असल्याने ते अजेय ठरेल, असा विश्वास व्यक्त करीत डॉ. थॉमस चेरियन यांनी वैद्यकीय विज्ञान क्षेत्रात दिलेल्या सामाजिक योगदानाचे कौतुक केले.

यावेळी वनराईचे विश्वस्त डॉ. गिरीश गांधी यांच्या हस्ते इंटरनॅशनल लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन प्रा.डॉ. थॉमस चेरियन यांचा शाल-स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रा.डॉ. चेरियन यांना यूके येथे 17 वर्षांचा सर्जिकल अनुभव आहे. त्यांनी 650 पेक्षा जास्त यकृत प्रत्यारोपण केले असून, यूके येथे सायंटिफिक बिझनेस पुरस्कार प्राप्त आहे. त्यांनी देशातील नागरिकांच्या यकृताचे आरोग्य सुधारण्यासाठी एक धाडसी, नवीन उपक्रम हाती घेतले आहे. त्यांच्या या कार्यासाठी सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी यकृत, कर्करोग आणि आरोग्यावर सविस्तर प्रेझेंटेशन सादर करीत जागृतीपर मार्गदर्शन केले. उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांची आणि शंकाचे त्यांनी निराकरण केले.

कार्यक्रमाच्या शेवटी महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा विदर्भचे अध्यक्ष अजय पाटील यांनी अध्यक्षीय भाषण केले. तत्पूर्वी शुभंकर पाटील यांनी प्रस्तावना केली. रोटरी क्लब ऑफ नागपूर एलिटने आतापर्यंत केलेल्या विविध आरोग्य उपक्रमाची माहिती दिली. रोटरीने नेहमीच सामाजिक कार्यासाठी पुढाकार घेतला आहे. आपण परिवार, मित्र आणि समाज मिळवू शकतो. मात्र, शरीर पुन्हा मिळविता येत नाही. त्यामुळे आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केली. प्रकल्प समन्वयक डॉ. अनुजा नन्नावरे यांनी पाहुण्यांचा परिचय दिला.

कार्यकमाला प्रगती पाटील, समा पंडीत, ममता जयस्वाल , हरविंदर सिंग मुल्ला, शरद नागदेवे , राजेश कुंभलकर, अभिषेक कपुर, डॅा अनुरिमा पानसे, सलोनी भागवानी, डॅा आयषा सायम , कार्तीक अस्वले डॅा विष्णू भुरे यांच्यासह शहरातील वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: