Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीत्याने आधी मित्रांसह प्रेयसीची केली हत्या !...नंतर मृतदेहासोबत केले असे कृत्य…

त्याने आधी मित्रांसह प्रेयसीची केली हत्या !…नंतर मृतदेहासोबत केले असे कृत्य…

न्यूज डेस्क : वासनांध माणसं कोणत्या थराला जातील हे आसाममधून समोर आलेल्या बातमीतुन समजते. येथे करीमगंज जिल्ह्यात एका प्रियकराने आपल्या दोन मित्रांसह आपल्याच प्रेयसीची हत्या करून तिच्या मृतदेहावर बलात्कार केला. मात्र, खून करून मृतदेहासोबत लैंगिक कृत्य केल्याप्रकरणी पोलिसांनी रेल्वे कर्मचाऱ्यासह तिघांना अटक केली आहे.

करीमगंज शहरातील बायपासजवळ ९ सप्टेंबर रोजी अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळून आला होता. त्याच दिवशी तिची हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. करीमगंजचे पोलीस अधीक्षक पार्थ प्रतिमा दास यांनी सांगितले की, पोस्टमार्टममध्ये नेक्रोफिलियाची पुष्टी झाली आहे. त्यामुळे लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एसपी म्हणाले की, तपासादरम्यान मुलीची वैयक्तिक डायरी सापडली, ज्यामध्ये फोन नंबर लिहिलेला होता. या क्रमांकावरून तिन्ही आरोपींची ओळख समोर आली. नंतर त्यांना त्यांच्या घरातून पकडण्यात आले.

हे संपूर्ण प्रकरण आहे
अधिकाऱ्याने सांगितले की, या तरुणीचे अलीकडेच भरती झालेल्या रेल्वे कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे तपासात समोर आले आहे. तो तिच्यावर सतत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता, मात्र तिने प्रत्येक वेळी नकार दिला.

9 सप्टेंबर रोजी प्रियकराला मुलगी घरी एकटी असल्याचे समजताच तो त्याच्या दोन मित्रांसह तेथे पोहोचला आणि त्याने मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केल्यावर आरोपीने तिची गळा आवळून हत्या केली आणि मृतदेहावर बलात्कार केला.

एसपी पार्थ म्हणाले की, आरोपींनी मृतदेह बायपासजवळ फेकून दिला होता, जिथून नंतर तो सापडला. त्यानंतर मुलीच्या पालकांनी त्याची ओळख पटवली.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: