Sunday, September 8, 2024
spot_img
Homeराज्यहजरत पीर जमाल शाह बाबा दर्गा ट्रस्टच्या वतीने मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त...

हजरत पीर जमाल शाह बाबा दर्गा ट्रस्टच्या वतीने मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त उत्साही मिरवणुक…

पनवेल – किरण बाथम

मोहम्मद पैगंबर जयंती निमित्ताने हजरत पीर जमाल शाह बाबा दर्गा ट्रस्टच्यावतीने आज भव्य मिरवणुक उत्साही वातावरणात संपन्न झाली. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

सुरुवातीला दर्गाचे मुख्य ट्रस्टी जावेद इब्राहिम फकीर मुजावर आणि सिजान मुजावर यांनी दोघांना पुष्पहार, मानाची टोपी आणि शाल देऊन सन्मानित केले. इस्लामच्या सकारात्मक बाबी आणि मोहम्मद पैगंबर यांच्या विचारांचे फलक घेऊन युवक वर्ग तन्मय होऊन मिरवणुकीत सहभागी झाले होते.

लहान लहान मुले खुप सुंदर वेशभूषा करून घोड्याच्या रथा मधून सहभागी झाल्याने कार्यक्रमाची रंगत वाढली होती. दुपारी पासून शेकडो लोक या उत्सवात सहभागी झाले होते. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न या मिरवणुकीचे सर्व लोक कौतुक करताना दिसत होते.दर्गा पासून स्टेशन रोड परिसर आणि सगळीकडे मिरवणूकीला उत्तम प्रतिसाद मिळाला होता.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: