Monday, December 23, 2024
HomeMarathi News Todayअशी गाडी कधी बघितली का?…काकाचा 'बकरी गाडीतून' प्रवास…पाहा व्हायरल Video

अशी गाडी कधी बघितली का?…काकाचा ‘बकरी गाडीतून’ प्रवास…पाहा व्हायरल Video

देसी जुगाड मध्ये भारतीयांचा जगात कोणीही हात पकडू शकत नाही. आपण घोडागाडी, बैलगाड्या खूप पाहिल्या असतील…त्याही चालवल्या असतील. पण तुम्ही ‘बकर्‍याची गाडी’ कधीच पाहिली नसेल! होय, सोशल मीडियावर एका वृद्धाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो दोन बकऱ्या, सायकलची चाके आणि लाकडापासून बनवलेल्या लाकडी गाडीतून प्रवास करताना दिसत आहे.

हे दृश्य पाहून अनेकांना धक्का बसला आहे, तर काहीजण हे दृश्य फक्त भारतातच पाहायला मिळत असल्याचं सांगत आहेत. आणि अर्थातच, काही लोक म्हणाले की हे शेळ्यांवरील क्रूरता आहे. ही बातमी लिहेपर्यंत ही इंस्टाग्राम रील हजारो वेळा पाहिली गेली आहे.

हा व्हिडिओ इंस्टाग्राम वापरकर्त्याने 17 डिसेंबर रोजी पोस्ट केला होता, ज्याला आतापर्यंत 37 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 1 लाख 38 हजार लाईक्स मिळाले आहेत. वृद्धाचा ‘देसी जुगाड’ पाहून लोक अचंबित झाले आहेत. यावर सर्व युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. कुठे काहींनी लिहिले की म्हातारपणात मेंदू गेला आहे, तर एकाने सांगितले की काका बकऱ्या मरतील. त्याचप्रमाणे, अनेक वापरकर्त्यांनी लिहिले की, लोक कसे बाजी मारतात. खाली Video पाहा…

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: