अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर मतदार संघात भाजप मध्ये अंतर्गत वाद विकोपाला गेलाय…भाजपचे विद्यमान आमदार हरिष पिंपळे यांच्या विरोधात भाजपचा एक गट एकवटला आहेय…हरिष पिंपळे यांना उमेदवारी न देण्याच्या मागणीसाठी मुर्तिजापूर विधानसभा मतदार संघातील शेकडो आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपच्या पक्ष श्रेष्ठींना निवेदन सादर केलंय…विद्यमान आमदार हरिष पिंपळे यांना परत उमेदवारी न देता पक्ष नेतृत्वाने येथे नवा उमेदवार द्यावा जेणे करून येथे आपला उमेदवार निवडून आणणे सुकर होईल असल्याचं एका निवेदनात म्हटलंय…हरिष पिंपळे यांच्या एंकदरीत कार्यपध्दतीमूळे, त्यांच्या अर्वाच्च बोलण्यामूळे, उर्मट वागण्यामुळे मतदार संघातील कार्यकर्त्याची आणि मतदारांची त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आल्याचं ही य पत्रात लिहण्यात आलय…
पत्रात काय लिहले ते पाहूया…
मुर्तिजापूर वि. स. मतदार संघातील शेकडो आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्याकडे आग्रहाची मागणी / विनंती करतो की, महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधान सभेच्या निवडणुकी करीता मुर्तिजापूर विधानसभा- ३२. या मतदार संघात विद्यमान आमदार हरिष पिंपळे यांना परत उमेदवारी न देता पक्ष नेतृत्वाने येथे नवा उमेदवार द्यावा जेणे करून येथे आपला उमेदवार निवडून येणे / आणणे सुकर होईल. येथील आमदार हरिष पिंपळे यांच्या एंकदरीत कार्यपध्दतीमूळे, त्यांच्या अर्वाच्च बोलण्यामूळे, उर्मट वागण्यामुळे मतदार संघातील कार्यकर्त्याची त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे. त्याच प्रमाणे मतदारांचा देखील आमदार पिंपळेंवर रोष आहे.
त्यांच्या बदल लोकामध्ये नाराजी आणि रोष असण्याचे इतरही कारणे आहेत. त्या गंभिर, आक्षेपार्ह बाबींचा सविस्तर तपशिल पक्ष नेतृत्वा समक्ष प्रत्यक्ष भेटून आम्हाला ठेवायचा आहेच. त्यामुळे कार्यकर्त्याच्या भावनेचा विचार करून आणि आपला भाजपाचा उमेदवार निवडून आणण्याच्या दृष्टीकोनातून आमदार पिंपळे यांना उमेदावरी नाकारून नवा सभ्य, सुसंस्कृत आणि कार्यकर्त्यांशी व जनतेशी विनम्रपणे वागणारा उमेदवार आम्हाला पक्ष नेतृत्वाने द्यावा ही आग्रही मागणी या निवेदनाद्वारे आम्ही आपणकाडे करीत आहोत.