Hardik Pandya Emotional : भारतीय टीमचा उपकर्णधार तसेच स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या दुखापतीमुळे ICC विश्वचषक 2023 मधून बाहेर करण्यात आले आहे. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाचा संघात समावेश करण्यात आला आहे. वर्ल्ड कपमधून बाहेर झाल्यानंतर हार्दिक पांड्याची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्याने ट्विट करून म्हटले की, मी विश्वचषकातून बाहेर आहे, मी विश्वचषकाच्या उर्वरित भागात खेळू शकणार नाही. हे पचायला खूप अवघड आहे. मी संघासोबत उत्कटतेने असेन आणि प्रत्येक सामन्यातील प्रत्येक चेंडूवर त्यांचा जयजयकार करेन. भारतीय संघाला माझ्या शुभेच्छा. मला मिळालेल्या प्रेम आणि समर्थनाबद्दल खूप खूप धन्यवाद. हे अगदी अविश्वसनीय आहे. मला खात्री आहे की आमचा संघ सर्वांना अभिमान वाटेल.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यात प्रसिद्ध खेळणार…
हार्दिक पंड्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. शनिवारी झालेल्या स्पर्धेच्या इव्हेंट टेक्निकल कमिटीने अनुभवी वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे. म्हणजेच रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विश्वचषक सामन्यात कृष्णाचा सहभाग असेल.
प्रसिद्ध कृष्णाच्या निवडीवर सोशल मिडीयावर संतापले
हार्दिक पांड्याला सुरुवातीच्या टप्प्यात दुखापत झाल्यानंतर बीसीसीआयचे अपडेट येत होते की तो लवकरच परतणार आहे. साखळी सामन्यांमध्ये तो पुनरागमन करू शकला नसला तरी उपांत्य फेरीत पंड्याचे पुनरागमन निश्चित असल्याचे सांगण्यात येत होते, मात्र आयसीसीच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. पंड्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाचा समावेश हाही मोठा प्रश्न आहे. अष्टपैलू खेळाडूऐवजी वेगवान गोलंदाजाचा संघात समावेश का करण्यात आला, तर भारताचे वेगवान गोलंदाज चांगली कामगिरी करीत असताना असा सवाल चाहते सोशल मीडियावर उपस्थित करत आहेत.
Tough to digest the fact that I will miss out on the remaining part of the World Cup. I'll be with the team, in spirit, cheering them on every ball of every game. Thanks for all the wishes, the love, and the support has been incredible. This team is special and I'm sure we'll… pic.twitter.com/b05BKW0FgL
— hardik pandya (@hardikpandya7) November 4, 2023