वंदे मातरम च्या गजराने शहरात भक्तिमय वातावरण…
शहीद वीर पत्नीचाही केला सन्मान…
पातूर – निशांत गवई
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात स्वातंत्र संग्रामातील अज्ञात नायक क्रांतिवीर स्वातंत्र्यसंग्रामात घडलेल्या विविध घटना यांची स्मरण व्हावे तसेच स्वातंत्र्यासाठी चितवलेलीस पुल्लिंग कायम ठेवत राहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाची अभिमान पूर्वक स्मरण करण्यासाठी मागील दोन वर्षापासून दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत शिक्षण विभाग जिल्हा परिषद अकोला तसेच शिक्षण विभाग पंचायत समिती कार्यालय पातुर यांच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे सामूहिक बांधिलकीचे मूर्त स्वरूप असलेल्या व देशभक्तीची भावना जागृत राहण्यासाठी पातुर येथील सावित्रीबाई फुले प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने हरघर तिरंगा अभियान 2024 विविध उपक्रम घेऊन राबवले गेले.
या अभियानाची सुरुवात तिरंगा ध्वज फडकवून व तिरंगा शपथ घेऊन केली. यावेळी गुरुवार पेठ पातूर येथील शहीद वीर आनंद काळपांडे यांच्या पत्नी विमलताई काळपांडे यांचा यथोचित सन्मान करून स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. हे अभियान राबवताना शाळेने समाजातील तरुण, वृद्द,पुरुष, महिला व समाजातील सर्व घटकांना सामावून घेतले होते.
या अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांनी स्थानिक पातळीवर राष्ट्रीय अभिमान आणि एकात्मतेची भावना जागृत करण्यासाठी स्थानिक पातळीवर तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये तरुण वृद्ध पुरुष महिला व समाजातील सर्व घटकांचा मोठ्या संख्येने समावेष होता.
तर शाळेतील काही विद्यार्थ्यांनी आपल्या सायकलवर तिरंगा ध्वज लावून तिरंगा रॅलीचे आयोजन केले व गावातून प्रभात फेरी काढून स्थानिकांचे लक्ष वेधून घेतले या भव्य दिव्य यात्रेमध्ये शालेय मुलांसह गावातील शेकडो स्त्री पुरुष पालक वर्ग सहभागी झाला होता दरम्यान गावातील समाजसेवकांनी विविध ठिकाणी विद्यार्थ्यांना पाण्याची,चॉकलेट, बिस्किटे वाटली. दरम्यान स्थानिक गायक कलाकार सुधाकर उगले व त्यांच्या चमुने देशभक्तीपर गीत गायन करून भक्तिमय वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला.
प्रभात फेरी दरम्यान शाळकरी मुलांनी तिरंगा कॅनव्हास या उपक्रमांतर्गत स्थानिक नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी स्थानिक भाषेत घरोघरी तिरंगा, जय हिंद, वंदे मातरम लिहून घेतले व त्यांचा उत्साह वाढवला. यावेळी विद्यार्थ्यांनी व स्थानिक नागरिकांनी तिरंगा ध्वजा सोबत सेल्फी काढून आनंद व्यक्त केला.