खामगांव – संकट मोचन हनुमान मंदिर रेल्वे स्टेशन लाईन याठिकाणी नागरिकांची पाण्याची समस्या दूर करण्यासाठी न.प.प्रशासनाची हप्सी (हँडपंप) आहे सदर सद्या परिस्तीत उन्हाळा असल्यामुळे व न.प. द्वारे पाणीपुरवठा १० ते १२ दिवसाच्या कालावधीत करतात.
यामुळे स्थानिक नागरिकांना या हप्सीच्या पाण्याचा खूप मोठा साथ आहे व नागरिक या हप्सीचे पाणी पिण्याकरिता वापरतात सदर हप्सीच्या बाजुला असलेली नाली नेहमी, नेहमी ब्लॉक होत असते व ब्लॉक झाल्यामुळे या नालीचे सर्व पाणी हप्सी जवळ येऊन थांबते अशी अवस्था झाल्यानंतरही नागरिक आपल्या व परिवाराचा जीवनाचा उदरनिर्वाह करण्याकरिता आपल्या आरोग्याची परवाह न करता हप्सी चे पाणी पिण्याकरीता याठीकानाहून भरत आहेत तरी न.प. प्रशासनाचे याठिकाणी दुर्लक्ष आहे न.प. प्रशासनाने जागे होऊन या परिसरातील नेहमीची हप्सीच्या बाजुला असलेली नाली ब्लॉक होणारी अडचण दुर करावी अशी मागणी नगरीच्या वतीने करण्यात येत आहे.