Monday, December 23, 2024
Homeराज्यमहाराष्ट्र नाभिक महामंडळ एकता मंच दुकानदार संघ रामटेक द्वारे हनुमान जयंती महोत्सव...

महाराष्ट्र नाभिक महामंडळ एकता मंच दुकानदार संघ रामटेक द्वारे हनुमान जयंती महोत्सव साजरा…

रामटेक – राजु कापसे

रामटेक येथे मागील ३० वर्षाच्या नियमित परंपरेनुसार महाराष्ट्र नाभिक महामंडळ एकता मंच सलुनदार संघ द्वारे न्हावी समाजाचे श्री बहीरमबाबा हनुमान मंदिर देवस्थान नेहरू मैदान रामटेक येथे भव्य प्रमाणावर हनुमान जयंती महोत्सव साजरा करण्यात आला.

पहाटेच्या प्रहरी दुकानदार संघांचे अध्यक्ष श्री क्रिष्णाभाऊ कावळे व महामंडळाचे जिल्हा सरचिटणीस श्री वैभवराव तुरक यांच्या शुभहस्ते भगवंताचा अभिषेक करण्यात आला. यावेळी श्री सुनील खुरगे,श्री उमेश पापडकर श्री सतिश सुरुसे प्रामुख्याने उपस्थित होते. आरती व प्रसाद अर्पण करुन करुन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

समस्त न्हावी समाजाच्या लोकवर्गणीतून यावर्षी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक जनमआनसआंनई या महाप्रसादाचा लाभ घेतला. या महोत्सवात न.प.रामटेकचे सन्माननीय नगरसेवक श्री सुमीतजी कोठारी,बिकेंन्द्रजी महाजन, महामंडळाचे मार्गदर्शक विवेकजी तुरक,राजेश जी किंमतकर त्याचप्रमाणे मा.आमदार जयस्वाल साहेब यांचे चिरंजीव की श्रेयस जयस्वाल यांची भेट लक्षणीय ठरली.

या महोत्सवाच्या आयोजनात सर्व सलुनदार संघाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सतत दोन दिवस भरपूर मेहनत घेत महोत्सव यशस्वी केला यात महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा रामटेक चे शहर अध्यक्ष श्री प्रफुल्ल अनकर तसेच रामटेक तालुकाध्यक्ष श्री जितेन्द्र वलोकर यांच्यासमवेत सर्वश्री रमेशजी उमरकर, सनी येऊतकर,आशीष पापडकर,

संतोष गणोरकर,श्याम वैद्य, सचिन वलोकर,मनोज वलोकर,मानकरजी, निखील लक्षने,अभिलाष ससानकर,नथ्थु चन्ने, रमेश (बापू) पापडकर,मंगेश पापडकर, मारोती चावके, सुनील रुद्रकार,अंकित पापडकर,संजय फुलबांधे,श्याम पगाडे, रोशन अनकर, सोमुजी वलोकर,तसेच एकता मंच रामटेक महिलाध्यक्ष सौ.रंजना वलोकर,व महीला पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

रामटेक शहरात न्हावी समाजात एवढा भव्य महोत्सव साजरा होतो.तसाच संपुर्ण नागपूर जिल्हात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असे मेळावे साजरे व्हावे याकरीता सर्वांनी एकत्र येऊन समाजासाठी व समाजाच्या विकासासाठी प्रयत्नरत राहावे व समाज संघटनेतून असे मेळावे आयोजन करावे जेणेकरुन भविष्यात आपला न्हावी समाज हा संघटीत व मजबूत राहील अशी भावना रामटेक शहरातील सर्वपरिचित व्यक्तीमत्व व समाजाला वेळोवेळी मदत व सहकार्य करणारे आदरणीय श्री बबलूजी फुलबांधे यांनी व्यक्त केली.

त्याचप्रमाणे न्हावी समाजाला रक्तदानाच्या माध्यमातून रक्तसेवा देणारे सर्वांचे लाडके श्री साक्षोधनजी कडवे सर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले माहिती हेतू प्रसारीत म.ना.म.एकता मंच सलुन दुकानदार संघ रामटेक.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: