Iraq fire Accident : उत्तर इराकमधील हमदानिया शहरात एका लग्न समारंभात लागलेल्या आगीत जवळपास 100 जणांचा मृत्यू झाला असून 150 जण जखमी झाले आहेत. तर मृत्यांमध्ये वधू वराचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती. निनेवे प्रांताच्या आरोग्य अधिकाऱ्याने या घटनेची माहिती दिली. हमदानिया हे मोसुलच्या पूर्वेला असलेले ख्रिश्चन शहर आहे.
या घटनेत जखमी झालेल्या लोकांना हमदानियाच्या मुख्य रुग्णालयात आणण्यात आले, तेथे रक्तदान करण्यासाठी बरेच लोकांची गर्दी जमली होती. रेफ्रिजरेटेड ट्रकच्या दारावर अनेक लोक काळ्या पिशव्या घेऊन जाताना दिसले. नागरी संरक्षण प्राधिकरणाने एका निवेदनात म्हटले आहे की, अत्यंत ज्वलनशील आणि कमी किमतीच्या बांधकाम साहित्याचा वापर केल्यामुळे ही आग लागली आणि आगीमुळे छताचा एक भागही कोसळला.
प्राथमिक माहितीनुसार, लग्न समारंभात फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली, त्यामुळे हॉलमध्ये आग लागली. इराकमध्ये सुरक्षिततेच्या नावाखाली बांधकाम आणि वाहतूक क्षेत्राकडे दुर्लक्ष केले जाते, त्यामुळे आगीच्या घटना वारंवार घडतात.
100 killed, 150 injured as fire rips through Iraq wedding
— ANI Digital (@ani_digital) September 27, 2023
Read @ANI Story | https://t.co/wppUaVZK05#iraqfireaccident #Iraq #FireatIraqWedding pic.twitter.com/YfRMJFHrUu