Hamas Terrorist : इस्रायल आणि हमासमध्ये सुरू असलेल्या भीषण युद्धादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. हवाई हल्ल्यात हमासचे हवाई दल प्रमुख मुराद अबू मुराद ठार झाल्याचा दावा इस्रायली लष्कराने केला आहे. इस्रायलच्या संरक्षण दलाने म्हटले आहे की त्यांनी गाझा पट्टीमध्ये रात्रभर केलेल्या हवाई हल्ल्यात हमास या दहशतवादी संघटनेच्या एका वरिष्ठ सदस्याचा खात्मा केला आहे.
इस्रायलने गाझा पट्टीवर रात्रभर केले हवाई हल्ले
इस्रायली संरक्षण दलांनी शनिवारी सांगितले की त्यांनी गाझा पट्टीमध्ये रात्रभर हवाई हल्ले केले, असे टाइम्स ऑफ इस्रायलने वृत्त दिले आहे. इस्रायल संरक्षण दलाने केलेल्या हवाई हल्ल्यात हमासचे हवाई ताफ्य प्रमुख मुराद अबू मुराद मारले गेल्याचा त्यांचा दावा आहे. या हल्ल्यात एका मुख्यालयाला लक्ष्य करण्यात आले जिथून दहशतवादी गट त्याच्या हवाई हालचालींवर नियंत्रण ठेवत होता.
दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना लक्ष्य करण्यात आले
गेल्या आठवड्याच्या शेवटी झालेल्या हत्याकांडात दहशतवाद्यांना मार्गदर्शन करण्यात अबू मुरादची मोठी भूमिका असल्याचे अहवालात म्हटले आहे. यामध्ये हँग ग्लायडरवर हवेतून इस्रायलमध्ये घुसलेल्या हल्लेखोरांचाही समावेश होता. आयडीएफने सांगितले की त्यांनी रात्रभर वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये हमास कमांडो दलाच्या डझनभर स्थानांना लक्ष्य केले. याच संघटनांनी ऑक्टोबर २०१५ मध्ये इस्रायलमध्ये घुसखोरी केली होती, असा त्यांचा दावा आहे.
इस्रायलमध्ये घुसलेले 1500 हमासचे दहशतवादी मारले गेले
हमासने शनिवारी इस्रायलवर अनेक हल्ले सुरू केले, ज्यात शेकडो लोक मारले गेल्याचे वृत्त आहे. एवढा मोठा संघर्ष अनेक दशकांनंतर दिसल्याचा दावा केला जात आहे. या हल्ल्यांमध्ये इस्रायलमध्ये 1,300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर इस्रायलने केलेल्या प्रत्युत्तरादाखल हवाई हल्ल्यांमध्ये गाझामध्ये 1,530 हून अधिक लोक मारले गेले आहेत, असे अहवालात म्हटले आहे. इस्रायलने दावा केला आहे की त्यांनी देशात घुसलेल्या हमासच्या सुमारे 1,500 दहशतवाद्यांना ठार केले आहे.
The IDF says that the head of the Hamas air force, Murad Abu Murad, was killed as a result of a night airstrike in the Gaza Strip. According to the IDF, the strike targeted the headquarters🤔 pic.twitter.com/trCpVq1JKY
— Sprinter (@Sprinter99800) October 14, 2023