Saturday, November 23, 2024
Homeमनोरंजनअर्धी मस्ती, अर्धा ढोंग नाटक बघुया, ही असा कोकणची कॉमेडी जत्रा..!

अर्धी मस्ती, अर्धा ढोंग नाटक बघुया, ही असा कोकणची कॉमेडी जत्रा..!

गणेश तळेकर

अर्धी मस्ती अर्धा ढोंग या नाटकाचा आशय ‘कोकणातली जमीन परप्रांतीयांना विकु नये’ असा आहे. एकदा मी मामाच्या गावाला गेलो असता त्या गावात माडावरून नारळ पाडणारा मद्रासी पहिला अणि मनत धाकधूक निर्माण झाली. जसे इंग्रज व्यापार करण्याच्या उद्देशाने भारतात आले त्यांनी भारतावर राज्य केलं. तसेच हे परप्रांतीय आपल्या कोकणात येऊन उद्या आपल्यावरच कुरघोडी सुरू करतील.

हा विषय गांभीर्याने लोकांपर्यंत पोहोचायला हवा असं वाटलं अणि नाटक ह्या माध्यममातून सावरायचं ठरवलं. गंभीर विषय प्रेक्षकांना रुचकर वाटावा म्हणुन लिहिताना विनोदी अंगाने नाटक लिहिलं अणि विनोदी ढंगाने सादर केलं तर प्रेक्षकाना आवडेल.

मुंबईहून आपली जमीन आपल्या नावावर करून घ्यायला आलेला येणारा चाकरमानी त्याच्या सोबत कोकण दाखवायला आपल्या मेहुणीला घेऊन येतो. तिची मालवणी भाषा शिकण्याची आवड अणि गावातील मंडळी तिला आपली भाषा प्रेमाने शिकवताना होणारे विनोद विनोदनिर्मिती करण्यास उपयुक्त ठरले.

कोकणातील जुनेजाणती मंडळी ज्यांना कोकणाचा आदर आहे त्यांना आपली कसलेली जमीन परक्याच्या हातात गेलेली आवडणार नाही असं पात्र म्हणजे चाकरमान्याचा काका. ज्याना अशी भीती आहे की जर पुतण्याने जमीन नावावर करून घेईल अणि जास्त पैशाच्या लालसेने तो पुढे जाऊन कोणा परप्रांतीयांना विकेल. पण त्याचा दुसरा काका ज्याला वाटत असतं त्याच्या हिस्सा त्याला मिळायलाच हवा.

दोन काकामध्ये होणारे मतभेद विषय खुलवण्यास मदत करतात.
कारण ह्यापूर्वी दोन तीन वेळा चाकरमानी जमीन नावावर करुन घ्यायला आला होता पण काहीना काही सबब दाखवून काकाने त्याला परत परत पाठवलेले असते. ह्या खेपेला कुठल्याही परिस्थितीत जागा नावावर करून घेतल्याशिवाय जाणार नाही पण शेवटी त्याला असच खाली हात जाव लागतं म्हणुन आनंदाच्या भरात नाचू लागतो, घड्याळ विसरल माझ्या तमाम मित्रमंडळींका विनंती वजा आग्रहाचं निमंत्रण रविवारी सकाळी अर्धी मस्ती अर्धा…

नाटकाक एवाच, जमीन नावावर करुन घेवचे चाकरमान्याचे प्रयत्न व ती जमीन परप्रांतीयांच्या घषात जाऊ नये म्हणान कोकणातल्या चाकरमान्याच्या काकाचे युक्तिवाद अणि ह्यो सिरियस विषय लेखकान किती विनोदी ढंगात मांडल्यान ह्या बघूक नक्किच येवा, कोकणातले एकेक इरसाल नमुने बघूक गावातले. मी थय आसतलय, ह्या निमतान भेट होयत… नक्की येवा आबापेडणेकर

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: