खामगाव – हेमंत जाधव
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावर असून काही भागात पाऊस पडत आहे.खामगाव तालुक्यातील काही भागात आज दुपारी गारपीट झाली आहे आज जिल्ह्यात सर्वत्र उन्ह असतांना दुपारच्या वेळेत अचानक अंधारून आले आणि बोरा च्या आकाराच्या गारा पडायला सुरुवात झाली या गारपीटी मुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे कित्तेक शेतकऱ्यांचा हरबरा आणि गहू शेतात पडून आहे गारपीटी मुळे हरबरा आणि गहू पिकाचे नुकसान होण्याची संभाव्य आहे.