वननिभाग झोपेत…
या आधी लाखपुरी येथील २ शेतकरी डुकरांच्या हल्यात जखमी…
लाखपुरी – मूर्तिजापुर तालुक्यातील लाखपुरी सह लाखपुरी सर्कल मधील अनेक गावात व मुर्तिजापुर तालुक्यामध्ये अनेक भागात जंगली डुकरे व जंगलालालागून असलेल्या शेतांमध्ये रानडुक्कर, रोही अशा प्रकारच्या जंगली प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात धुडगूस सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
वन्य प्राणी अन्नाच्या शोधात रात्री डुकराद्वारे कपासी, हरभरा सह काढणीला आलेल्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले जात आहे. डुकरे रात्रीच्या वेळेस शेतात घुसून पिकांची नासधूस करत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. दिवसभर शेतात राबून रात्री डुकरा पासून पिकांची राखण करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. उभी पीक खाऊन जात आहे.
या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाले आहे. कमी पर्जन्यमानात मोठ्या कष्टाने अनेक अडचणींना सामोरे जात शेतक-यांनी शेती फुलवली आहे. यामुळे त्या दिवसापासून रात्रभर जागरण करून, राहिलेल्या पिकाचे राखण करण्यात येत आहे. शेतक-यांनी डुकरांच्या त्रासामुळे ज्वारी पिक पेरणी बंद केली आहे. शेतक-यांचा वाली कोणीच नाही येथील लोकप्रतिनीधी मात्र मलीदा खाण्यात व्यस्त असुन नागरिकांच्या प्रश्न मात्र त्यांना दिसत नाही.
निवडणुकींच्या तोंडावर मात्र त्यांना गावात पाहावयास मिळते असे मत नागरिक बोलतात तरी शेतक-यांच्या हितासाठी प्रशासनाने या डुकरांच्या बदोबस्त करुन शेतक-याच्या अडचणी व प्रश्नावर लवकर तोडगा काढावा व वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरु लागला आहे..
डुक्कर, रोही ,हरण , वानर इ . मुळे रात्री बेरात्री शेतीचे रखवाली करुन सुध्दा शेताच्या पिकांचे नुकसान होत आहे. तरी शासनाने सर्व शेतक-यांना कंपाऊन्ड अनुदावर द्यावे जेणे करुन शेतक-याला त्रास होणार नाही.
माणिक नवघरे (शेतकरी लाखपुरी )
मी माझ्या शेतात ४ एक्कर हरभरा पेरला तेव्हा पासुन सतत १० दिवस शेतात रखवाली करुन सुध्दा डुकरांनी हरभरा पिकांचे नुकसान केले . करावे तर काय करावे हा प्रश्न मला पडला आहे. तरी शासनाने मला झालेल्या नुकसांनाची भरपाई द्यावी.
गजानन गवई ( शेतकरी खुंदावंतपुर )
लाखपुरी सह लाखपुरी सर्कल मधीलव तालुक्यातीस शेतक-यांचे जंगली प्राण्यानमुळे व रोही , डुकरे रात्रीच्या वेळेस शेतात घुसून पिकांची नासधूस करत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. तरी संबधित विभागाने याकडे लक्ष देवुन शेतक-यांना आर्थिक मदत करावी व शेतक-यांचे प्रश्न सोडवावे .
सौ. मिनल नवघरे ( माजी . पं. स. सदस्या लाखपुरी )