Gyanvapi Case : अलाहाबाद उच्च न्यायालयाने ज्ञानवापी संकुलाच्या तळघरात हिंदूंना पूजा करण्यावर बंदी घालण्याची मागणी करणारी मुस्लिम पक्षाच्या बाजूची याचिका फेटाळली आहे. ज्ञानवापी मशीद समितीने वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले होते, ज्यामध्ये हिंदूंना ज्ञानवापीच्या तळघरात पूजा करण्याची परवानगी देण्यात आली होती.
उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात काय म्हटले?
न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांनी निकाल देताना सांगितले की, या खटल्यातील संपूर्ण रेकॉर्ड पाहिल्यानंतर आणि संबंधित पक्षकारांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, जिल्हा न्यायालयाचा निर्णय कोणत्या आधारावर बदलण्यात यावा, असे काहीही न्यायालयाला आढळले नाही. . 17 जानेवारी रोजी जिल्हा न्यायालयाने मालमत्तेचा रिसीव्हर म्हणून जिल्हा दंडाधिकारी यांची नियुक्ती केली होती. त्याचवेळी 31 जानेवारीच्या आदेशानुसार येथील तळघरात पूजेला परवानगी देण्यात आली.
जिल्हा न्यायालयाने काय निर्णय दिला?
वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने 31 जानेवारी रोजी दिलेल्या आदेशात म्हटले होते की, हिंदू पक्ष ज्ञानवापी मशिदीमध्ये असलेल्या व्यासजींच्या तळघरात पूजा करू शकतात. पूजेची व्यवस्था करण्याचे आणि श्री काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टने नामनिर्देशित पुजारी नेमण्याचे निर्देशही न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्याचवेळी मुस्लिम पक्षाने या निर्णयाला अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
एएसआयच्या अहवालात काय आढळले?
ज्ञानवापी ही मशीद की मंदिर यावरून वाद वाढला आहे. एएसआयच्या सर्वेक्षण अहवालानुसार, परिसरात अशा अनेक खुणा आढळून आल्या आहेत ज्यावरून असे दिसून येते की येथे मशिदीपूर्वी हिंदू मंदिर होते. ज्ञानवापी हे प्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिराशेजारी आहे. मशीद संकुलात चार तळघर आहेत. यापैकी एक व्यासजींचा तळघर आहे ज्यामध्ये पूजा करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
Gyanvapi Mosque case | Advocate Vishnu Shankar Jain, representing the Hindu side says "Today, the Allahabad High Court has dismissed the first appeal from orders of Anjuman Intezamia wherein the order of 17th and 31st January passed by Varanasi District Court was under challenge… pic.twitter.com/pOf5BKWQ8f
— ANI (@ANI) February 26, 2024