सांगली – ज्योती मोरे
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कवठेमंकाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगार ज्ञानू खोत टोळीस पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी सांगली आणि सोलापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश पारित केले आहे.यामध्ये टोळीप्रमुख ज्ञानू अण्णाप्पा खोत. वय वर्षे- 23, राहणार- कोंगनोळी. सुरेश उर्फ अर्जुन महादेव पोतदार.
वय वर्षे- 25, राहणार- अग्रणी धुळगाव.संदीप भारत पाटील. वय वर्षे- 20,राहणार- कोंगनोळी आणि मारुती दादासो लिंगले. वय वर्षे- 22, राहणार – यांचा समावेश आहे. हे सर्वजण कायद्याला न जुमानणारे असल्याने या टोळी विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये प्रभावी अधिकारी कवठेमंकाळ पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षकांकडे याबाबत प्रस्ताव सादर केला होता.
सदर, प्रस्तावाचा अवलोकन करून सर्व बाबींचा विचार करून सदरची कारवाई करण्यात आली, ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे, परिविक्षाधिन पोलीस उपाधीक्षक संदेश नाईक,
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, कवठेमंकाळचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील, श्रेणी पोलीस अधीक्षक सिद्धाप्पा रुपनर, पोलीस कॉन्स्टेबल दीपक गट्टे, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल मनीषा बजबळे आदींनी केली.