मूर्तिजापूर येथील सामाजिक कार्यात अग्रेसर ज्ञान नर्मदा बहुद्देशीय संस्था द्वारा दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सुनिता विष्णू लोडम यांच्या संकल्पनेतून हिरपूर रोड येथील गायरान कुष्ठरोगी दिव्यांग वस्तीमध्ये जाऊन दिवाळी फराळ वाटप कार्यक्रम करून गरजू लोकांची दिवाळी साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवर महिलांनी दिव्यांग बांधवांच्या व्यथा जाणून घेतल्या व त्या पूर्ण करण्याकरिता शासन दरबारी पाठपुरावा करण्याबाबत आश्वासित केले.
यावेळी प्रामुख्याने सौ सुनीता विष्णू लोडम, सौ अमिता तिडके, सौ दिपाली देशमुख, सौ कल्पना तिडके, सौ रूपाली तिडके, सौ नम्रता भिंगारे, सौ माया दवंडे, सौ मीरा बोंडे, सौ समृद्धी तिडके, कु.शितल देवके उपस्थित होत्या कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता हॅपी वुमन्स क्लब च्या महिला सदस्यांनी परिश्रम घेतले.