Sunday, December 22, 2024
Homeराज्यगुरुकुल पब्लिक स्कूल | पातूर येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न...

गुरुकुल पब्लिक स्कूल | पातूर येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न…

ज्येष्ठ पत्रकार देवानंद गहिले यांचे हस्ते ध्वजारोहण

पातूर – निशांत गवई

पातूर येथील गुरुकुल पब्लिक स्कूल ढोणे नगर पातुर येथे 15 ऑगस्ट 2024 रोजी ध्वजारोहण संपन्न झाले. स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सर्वप्रथम पातुर येथील ज्येष्ठ साहित्यिक देवानंद गहिले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अंकुर साहित्य संघाचे केंद्रीय संघटक साहित्यिक देवानंद गहिले तर प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठलराव राऊत राहणार खानापूर यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमांची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमेच्या पूजनाने मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली त्यानंतर हर घर तिरंगा या धर्तीवर हर घर शिक्षण या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी शालेय उपक्रम ज्यामध्ये कविता गायन, कथा सांगणे, शालेय अभ्यासक्रमाचे कृतीयुक्त प्रात्यक्षिक पालकांना दाखविण्यात आले. विविध वेशभूषा साकारण्यात आल्या होत्या युकेजी वर्गातून अमेय ढोकणे, सीया बगळेकर, शौर्य बगळेकर,दर्शन तायडे, रुद्र कावळे, नित्या लढाळ, तन्वी करवते यांनी इंग्रजीतून संभाषण केले तसेच एलकेजी वर्गातून देवांश मेन, अधिरा हाडके,

प्रीयांशा इंगळे, कृष्णाली बगळेकर, माही कांबळे, शौर्य मोरे, लावण्य भूतकर, स्वरित खंडारे, ईशांत चव्हाण, अर्पित शिरसाट, स्वराज् चतरकर, युग सरदार, शिवांश गिरे,अक्षय गाडगे, सार्थक आडे, विहान करवते, निधी जावळे, नर्सरीतून विदिशा हिवराळे, श्लोक राऊत, आदित्य मोकळकार, स्वराज, काव्यांस, सुशांत, संचित, आदर्श, अन्वी, रिध्वांश, वेदांत, सोहम, श्रवण आदींनी सहभाग घेतला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्रणिता अवचार मॅडम तर आभार प्रदर्शन कु. किरण गवळी यांनी केले कु. अश्विनी तायडे कविताबाई तायडे कर्मचारी उपस्थित होते तसेच संस्थेचे पदाधिकारी, सौ. योजना ताई ढोकणे,

श्री महादेवराव ढोकणे, सौ. मंजुळाबाई ढोकणे, प्रवीण गिरे, मनोज राऊत, पालक वर्गातून सौ कविता मेन, योजना कांबळे, सौ पूजा बगळकर, सौ. वनिता बगळेकर प्रतिमा बगळे कर कांताबाई करवते, आरती घोलप, शारदा मुखळकर सारिका करवते, शोभाताई कांबळे, काजल हरणे, रवीना सरदार यांची उपस्थिती होती कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरता शिवाजी मोकळकार, प्रजोत फुलारी, गजानन तायडे, हरिहर तायडे, दीपक करवते यांचे सहकार्य लाभले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: