Monday, December 23, 2024
Homeराजकीयगुरुद्वारा बोर्डाचे कायम कर्मचाऱ्यांची वार्षिक वेतन वाढ रखडल्याने प्रशासकांना साकडे...

गुरुद्वारा बोर्डाचे कायम कर्मचाऱ्यांची वार्षिक वेतन वाढ रखडल्याने प्रशासकांना साकडे…

नांदेड – महेंद्र गायकवाड

सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे कायम कर्मचारी वार्षिक वेतन वाढीपासून वंचित राहिल्याने त्यांना महागाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत . त्यामुळे दैनंदिन व पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने तात्काळ वेतन वाढ देऊन दिलासा द्यावा अशी मागणी गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक विजय सतबीरसिंघ यांना अधीक्षक ठाणसिंग बुंगई यांच्यामार्फत निवेदनाद्वारे केली आहे.

गुरुद्वारा बोर्डाचे स्थायी कर्मचारी हे गुरुघरची सेवा करण्याच्या श्रद्धेमुळे कोणत्याही अग्रीम वेतन शिवाय निष्कामपणे 24 तास सेवा देत असतात. नियमाप्रमाणे गुरुद्वारा बोर्डाच्या कर्मचाऱ्यांना दर पाच-सहा वर्षानंतर सुधारित वेतनश्रेणी देणे आवश्यक आहे. शासन नियमाप्रमाणे व सहाव्या वेतन आयोगतील तरतुदींप्रमाणे प्रतिवर्ष 3 टक्के वेतन वाढ केली जाते.

गुरुद्वारा कर्मचाऱ्यांना 2010-11 ते 2022 दरम्यान वेतन वाढ देण्यात आली. त्यानंतर बोर्डाची आर्थिक परिस्थिती खराब असल्याकारणाने तत्कालीन प्रशासकांनी थोडासा कालावधी मागितला होता. आता 1 जुलै 2023 पर्यंतची सुधारित वेतन वाढीची रक्कम कर्मचार्‍यांना अदा करून वाढत्या महागाईमुळे निर्माण होत असलेल्या पाल्यांच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवावा अशा मागणीचे निवेदन स्थायी कर्मचाऱ्यांनी प्रशासक डॉ. विजय सतबीरसिंघ यांना गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक सरदार ठाणसिंघ यांच्यामार्फत निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनावर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रदीपसिंघ मान, दर्शनकौर हजुरिया, कश्मीरसिंघ दरोगा, हरपालसिंघ शिलेदार, सुरेंद्रसिंघ असर्जनवाले, विक्रमसिंघ कलमवाले, गुलाबसिंग लांगरी, राजेंद्रसिंघ शाहू, रवीदरसिंघ भोसीवाले, किशनसिंघ, किरणकौर शाहु, जसबिरकौर व दीपेंद्रसिंह मुनिम यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: