अमरावती – दुर्वास रोकडे
गुरू शिष्य या अतूट नात्याची ओळख करून देणारा उत्सव म्हणजे गुरूपौर्णिमा उत्सव आणि दरवर्षी हा कार्यक्रम मोठ्या उत्सुकतेने संगीत विद्यालयाचे विद्यार्थी , पालक आयोजित करतात. या कार्यक्रमाची सुरुवातीला सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन अण्णा भाऊ साठे विचार मंच शाखा काजना ता. नांदगाव खंडेश्वर चे सामाजीक कार्यकर्ते श्री.विश्वासराव चिंतामणजी कांबळे व विद्यार्थी पालक प्रतिनिधी नितीन कुबडे यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या मधुर वाणीतून गुरूची महती गायली जाणारी गीते गायली त्यामध्ये समर्थ निपाने,स्नेहल निंभेकर, हर्षल ऊईके, प्रज्योत ढोबाळे, दिनांशू खैरकर,श्याम तालन, अर्णव वानखेडे,नैतिक वानखेडे,यामिनी साहू,देव मोधळकर, रूद्र कोल्हे , गितेश तंवर इत्यादी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.या कार्यक्रमाची आखणी संकेत बंड,मनोज राऊत,नयन वानखेडे,सागर मुंदाने,धार्मिक इंगोले, यांनी केली.
विद्यार्थ्यांच्या सादरीकरणात स्व. गोपालराव घुडजी संगीत विद्यालय मोझरी येथील विद्यार्थी आरुषी निमकर,वेदश्री लांडे,खुशी लांडे वांशिका खंडारे,यांच्या हस्ते सुरवात करण्यात आली असून त्या कार्यक्रमात गजल स्नेहांशू हेंडवे,तबला प्रणव कुबडे, यांच्या सादरीकरणाने सर्व श्रोते मंत्रमुग्ध झाले.या कार्यक्रमामध्ये मोबाईल पॅडचे रोनित कडू, व ओरिजनल पॅड सागर मुंदाने याचे वादन सादरिकरण करण्यात आले त्यावेळी मोबाईल पॅड हा लक्षवेधी ठरला त्या कला कौशल्या बाबत रोणित कडू यांचा पं.नारायणरावजी दरेकर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी गुरुपुजनाला सुरवात केली त्यावेळी गुरुवर्य पं. रघुनाथदादा कर्डिकर (गायक व संगीतकार आकाशवानी,दूरदर्शन कलावंत) यांच्या गुरुपुजनाकरीता संगीत विद्यालयाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. सुनिल इंगोले यांनी सुरवात केली त्यावेळी मध्यप्रदेश मधील हूमणे,श्री. संत अच्युत महाराज संस्थानचे कार्यकर्ते प्रदीप घुरडे,अक्षय भेलकर,शुभम देवळे व सर्व शिष्य मंडळी उपस्थित होती.त्यानंतर संपूर्ण शास्त्रीय संगीतचे कार्यक्रम घेण्यात आले त्यावेळी प्रथम सत्रात गणेश सरोदे यांनी शास्त्रीय गायनाला सुरवात केली त्यावेळी हार्मोनियम अंकुश ठाकरे,तबला उपदेश इंगोले त्यानंतर विविध पुरस्कारप्राप्त दूरदर्शन कलावंत खर्ज सप्तका खाली लर्ज सप्तकात गाणारे देश विदेशात कार्यक्रम करणारे पं.ज्ञानेश्वर बालपांडे यांच्या गायनाकरीता संवादिनी साथसंगत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक पं. नारायणरावजी दरेकर गुरुजी व तबला संगतॲड. संकेत जोशी टाळाची साथ धार्मिक इंगोले यांनी केली.
व्दितीय सत्रात प्रा. देवेंद्र देशमुख व संच अकोला यांनी संगीत मैफील रंगवीली आणि समारोपीय कार्यक्रमात पं. योगेशजी बोडे यांनी सितार वादन केले त्यांच्या सितार वादनाने परिसरातील संपूर्ण वातावरण प्रसन्न व आनंदमय झाले यामध्ये तबला संगत कश्या प्रकारे करावी याबाबत तबला वादन कसे असायला हवे या सर्व बाबी ॲड. संकेत जोशी यांच्या तबलावादनातून निर्दशनास आल्या हा संपूर्ण कार्यक्रम संगीत विद्यालयाचे संस्थापक बलदेवराव इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली झाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैष्णवी काजळकर यांनी केले व आभार प्रदर्शन स्थानिक कलकार श्री. संजय ठाकरे यांनी केले