गुजरातमधील मेहसाणा येथील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये काही लोक घराच्या छतावरून ५०० आणि १०० रुपयांच्या नोटांचा पाउस पाडत असल्याचे दिसत आहे. त्यांना गोळा करण्यासाठी घराखाली लोकांची मोठी गर्दी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील मेहसाणा येथील एका माजी सरपंचाने आपल्या भाच्याच्या लग्नात नोटांचा वर्षाव केला. अनगोळ गावचे माजी सरपंच करीम यादव यांनी त्यांच्या घराच्या छतावर उभे राहून 100 आणि 500 रुपयांच्या नोटा उडवल्या, ज्या जमा करण्यासाठी घराखाली लोकांची मोठी गर्दी झाली होती. त्याचवेळी छतावरून उडवलेल्या नोटा गोळा करताना लोकांमध्ये बाचाबाचीही झाली.
करीमचे बाकीचे कुटुंब लग्नाच्या सोहळ्यात संपूर्ण गावाला सहभागी करून घेण्यासाठी नोटांचे वाटप करतात. यादरम्यान करीमची संपूर्ण गावात मिरवणूकही काढण्यात आली.