Gujarat Accident : गुजरातमधील आनंद शहराजवळ अहमदाबाद-वडोदरा द्रुतगती मार्गावर सोमवारी सकाळी एका वेगवान ट्रकने उभ्या असलेल्या बसला धडक दिल्याने सहा जण ठार, तर सहाहून अधिक जखमी झाले. आनंद जिल्ह्यातील चिखोदरा गावाजवळ पहाटे 4.30 च्या सुमारास अहमदाबादकडे जाणारी खासगी लक्झरी बस टायर फुटल्याने रस्त्याच्या कडेला उभी असताना हा अपघात झाला, अशी माहिती आनंद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिली. अधिका-याने सांगितले की, टायर बदलले जात असताना बसमधील प्रवासी खाली उतरले आणि त्यांच्यापैकी काही वाहनासमोर थांबले असताना पाठीमागून भरधाव येणाऱ्या ट्रकने बसला धडक दिली.
मृतांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बस महाराष्ट्रातून राजस्थानला जात होती आणि आनंदजवळ बस पंक्चर झाली. त्यामुळे बसचा चालक आणि प्रवासी बसखाली उभे असताना एका ट्रकने बसला मागून जोरदार धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच आनंद अग्निशमन विभाग, एक्सप्रेस हायवे पेट्रोलिंग टीम आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. मृतांमध्ये बस चालकाचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये तीन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश असून त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यापूर्वी १२ जुलै रोजी गुजरातमधील पाटण येथे झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही बस आणि ट्रकची धडक झाली. या अपघातात बसचा चालक आणि वाहक यांचाही मृत्यू झाला आहे. ट्रकचा ड्रायव्हर आणि क्लिनरलाही जीव गमवावा लागला.
#WATCH | Gujarat: Several people injured after a bus collided with a truck on the Ahmedabad-Vadodra Express Highway in Anand, earlier today.
— ANI (@ANI) July 15, 2024
(Source: Fire Department, Anand, Gujarat) pic.twitter.com/JI67jNmhn2