Sunday, December 22, 2024
Homeराज्यवेगळा विदर्भसाठी अर्ध नग्न आमरण उपोषण करणाऱ्या मंडपात मार्गदर्शन करताना - एन....

वेगळा विदर्भसाठी अर्ध नग्न आमरण उपोषण करणाऱ्या मंडपात मार्गदर्शन करताना – एन. आर.रामेलवार…

रामटेक – राजु कापसे

सीपी अँड बेरार काळामध्ये नागपूर ही राजधानी होती. राजधानी असलेले हे शहर महाराष्ट्रात विलीन झाल्यानंतर उप राजधानीचा दर्जा मिळाला. परंतु नागपूरला मिनी मंत्रालय सुद्धा मिळाले नाही. विदर्भाचा बॅकलॉग वाढतच गेला. तो बॅकलॉग भरून काढण्याचं आश्वासन भाजपा सरकारने दिलेले होते.

आता कोणत्याही विभागाचा बॅकलाग भरून काढण्यात आलेला नाही. केंद्रात व महाराष्ट्रामध्ये भाजपचे बहुमताने सरकार असताना सुद्धा आहे. ते पण भाजप सरकार विदर्भ देण्याचे आश्वासन पाळीत नाही आहे. यांच्या दृष्टिकोन विदर्भ विषयी वेगळाच आहे.

राष्ट्रांमध्ये विदर्भ विलीन झाल्यानंतर, राजधानी असलेलं नागपूर उपराजधानीचा दर्जा मिळाला तरी संतोष मानले. मात्र पश्चिम महाराष्ट्र, मुंबईचे आमदार वर्ग नागपूर राजधानी असलेले शहराला वेगळा विदर्भ द्यायला तयार नाही. ही मानसिकता आहे. बॅक लॉगभरायचा नाही व वेगळा विदर्भही द्यायचा नाही, सतत विदर्भाला उपेक्षित ठेवायचे हे धोरण दिसून येत आहे.

म्हणजेच काँग्रेस आणि भाजपा मध्ये कोणताही फरक दिसून येत नाही. वेगळ्या विदर्भा शिवाय तरुणांना नोकऱ्या, व्यवसाय, महिलांना रोजगार मिळू शकत नाही. विदर्भात खनिज संपत्ती,मुबलक वीज असताना सुद्धा, वनाचे क्षेत्र सुद्धा जास्त आहे. अन्नधान्य मत्स्य व्यवसाय सुद्धा पुरेशा प्रमाणात आहे. असताना सुद्धा वेगळा विदर्भ देण्याची मानसिकता सत्ताधारी केंद्र व राज्य सरकारमध्ये दिसून येत नाही. त्यामुळे तरुण वर्ग संतापलेला आहे.

जाबुवंत राव धोटे खासदार असताना वेगळ्या विदर्भाची मशाल चांगली जोमात आणलेली होती. बॅरिस्टर रामराव आदिकांची मुलगी जामबुवतराव धोटे यांना दिल्यानंतर, कांग्रेसने खेळी खेळून, मा.जमवंतराव धोटे साहेबांची तेज धार कमी झाली. नंतर बॅकलॉगचे गाढे अभ्यासक एडवोकेट मधुकररावजी किंमतकर यांनी बॅगलोगचा भरपूर अभ्यास करून शासनासमोर तो बॅकलाग सादर केला.

तरी पण शासनाला जाग आली नव्हती. सरकारने वेगळे विदर्भ देण्याच्या आश्वासन दिलं होतं त्या सदराखाली विदर्भाने भाजपला भरपूर विदर्भातून मते देऊन त्यांना सत्तेवर आणण्याचे काम केले. विदर्भवासीयांशी भाजप सरकारने दगाबाजी केली. सरकार सांगत होते की आम्ही बॅकलाग पूर्ण करू. मात्र ते काम आजपर्यंत झालेले नाही.

तरुण वर्गाने विदर्भासाठी पुढाकार घेऊन गावा गावात गल्ली मध्ये विदर्भाचा आवाज बुलंद केला पाहिजे वेगळ्या विदर्भाचे अध्यक्ष एडवोकेट शशिकांत ठाकूर यांनी व्यक्त केले. यासाठी गाव पातळीवर तालुका पातळीवर सभा घेण्यात येईल असेही अध्यक्ष एडवोकेट ठाकूर यांनी सांगितले.

अर्ध नग्न आंदोलन करून यशवंत स्टेडियम मध्ये विदर्भ वेगळा का पाहिजे आहे याबद्दल एँडवोकेट ठाकूर, नत्थुजी रामेलवार, महामंत्री सोनू बरीया, विदर्भ उपोषण प्रमुख विजय, हिवराळे, नागपूर जिल्हा महामंत्री वकील देव विश्वकर्मा, नागपूर जिल्हा अध्यक्ष सुनील वानखेडे, नागपूर शहर अध्यक्ष विकी कांबळे, सावनेर तालुका अध्यक्ष संदीप पवार,

संघटक नागपूर जिल्हा महेश इखार, नागपूर जिल्हा उपाध्यक्षसचिन फसाटे, कळमेश्वर तालुकाध्यक्ष हरीश खोरगडे, नागपूर कार्यकर्ता संतोष वानखेडे इत्यादी कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते. एकच मांग वेगळा विदर्भ घोषणांनी यशवंत स्टेडियम दुमदुमून गेलेला होता.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: