अकोला – महसूल विभाग आणि कृषी विभागाच्या वतीनं ई-पीक पाहणी हा संयुक्त प्रकल्प राबवण्यात येत आहे. ‘माझी शेती, माझा सातबारा, माझा पिकपेरा’ या घोषवाक्याचा आधारे शासनाने सुरू केलेल्या पीक पाहणी करण्याच्या महसूल विभाग आणि कृषी विभागाच्या वतीनं ई-पीक पाहणी हा संयुक्त प्रकल्प राबवण्यात येत आहे. ‘माझी शेती, माझा सातबारा, माझा पिकपेरा’ या घोषवाक्याचा आधारे शासनाने सुरू केलेल्या पीक पाहणी करण्याच्या उपक्रमास १ ऑगस्टला सुरुवात झाली.
परंतु, ग्रामीण भागात या अॅपसंदर्भात शेतकरी संभ्रमात होते. यासाठी तलाठी हे हातरूण मंडळातील सात गावातील शेतशिवारात जावून शेतकऱ्यांना ई-पीक पहाणीसंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. काही जिल्ह्यांमध्ये पीक पाहणी अॅपला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे. तर काही ठिकाणी महसूल प्रशासनाला पीक पाहणी अॅपचा वापर करावा, यासाठी शेतकऱ्यांमध्ये जाऊण जनजागृती करावी लागत आहे. ई-पीक पाहणी अपद्वारे नोंदी घेण्यास शेतकऱ्यांना १५ सप्टेंबर मुदत देण्यात आली आहे.
सातबारा उतारा- ऑनलाईन पद्धतीने खरीप हंगामातील पिकांच्या नोंद करण्याच आवाहन अधिकारी ए. ए. घाटे, तलाठी सतिश कराड, तलाठी राजेश पवार, कोतवाल राजु डाबेराव, कृषी सहाय्यक गजानन इंगळे यांनी यावेळी केले. तसेच त्याचे प्रात्यक्षिकही करवून घेतले. यावेळी शेतकरी बाबाराव वानखडे, महेश मोजणे, संजय इंगळे, दिनकर चव्हाण परिसरातील असंख्य शेतकरी हजर होते.