रामटेक: – राजु कापसे
कविकुलगुरु इंस्टिटयूट ऑफ टेक्नालॉजी अँण्ड सायंस (किट्स) रामटेक मध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती (आयसीसी) तर्फे छत्रपती शिवाजी सेमिनार हॉल मध्ये महिलांचे आरोग्य व सुरक्षिकता या विषयावर जनजागृति कार्यक्रम ११ ऑक्टोबर ला संपन्न झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन एचसीजी एनसीएचआरआय कॅन्सर सेंटर नागपुरच्या डॉ. सुचिता मेहता यांनी केले. अध्यक्षता अधिष्ठाता(विद्या विभाग)डॉ विलास महात्मे यांनी केली. या वेळी प्रामुख्याने आयसीसी प्रमुख प्रा. वैशाली पांडे, योग प्रशीक्षक डॉ. अंजली जोशी,डॉ.शिल्पा आष्टणकर सहित विभाग प्रमुख, डीन, प्राध्यापक व विद्यार्थीनी मोठ्या संखेत उपस्थित होत्या.
डॉ. सुचिता मेहता यांनी प्रेझेटेंशन द्वारे कॅन्सर होण्याचे कारण व त्यावर उपाय पद्धती तसेच महिलांना होणारे अन्य आजार या विषयी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की वेळेवर उपचार केला तर कॅन्सर सुद्धा बरा होवू शकतो.योग प्रशिक्षक डॉ. अंजली जोशी यांनी योगा वर मार्गदर्शन केले व म्हणाल्या की चांगल्या आरोग्याकरीता नियमित प्राणायाम व योगा करा,मजबूत बना.स्वतःची सुरक्षा स्वतः करा..
कार्यक्रमाकरिता किट्स चे सचिव श्री वी.श्रीनिवास राव तसेच प्राचार्य डॉ अविनाश श्रीखंडे यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच डॉ. के. गजानन, प्रा. श्रीनिवास रायडू, संगीता भूरे, रूपेश कठाने सहित इतरांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रयत्न केले.
प्रस्तावना प्रा. वैशाली पांडे तर संचालन,डॉ.शिल्पा आष्टणकर व आभार आयटी विभाग प्रमुख प्रा. सरोज शंभरकर यांनी केले.