रामटेक – राजू कापसे
कविकुलगुरु इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी एंड सायंस (किट्स) मधे स्टाफ क्लबच्या माध्यमातून गॅस सिलेंडर मधील लिकेज व त्यामुळे होणाऱ्या दुर्घटना व उपाय यावर गॅस सेफ्टी सुरक्षा अभियान अंतर्गत कार्यक्रम 12 डिसेंम्बरला आयोजित करण्यात आला.
आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत सिलेंडर वापरतांना सूर्या गैस सेफ्टी चे साहिल सारस्कर यांनी मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करून दाखविले. ते म्हणाले की सिलेंडरला लाल रंग दिला आहे. गैस सिलेंडर अत्यंत स्फोटक आहे. उपयोग झाल्यावर रेगुलेटर बंद करावा. सिलेंडरचे वजन मोजुन घ्यावे. गैस वाल्व चेक करावे. वाल्व मधे पानी टाकून लीकेज चेक करावे.
नियमित गैस पाइपची चेकिंग करावी. दर तीन वर्षानी रेगुलेटर बदलावे.सूर्या कंपनी कडून गैस सिलेंडर करिता सेफ्टी डिवाइस आले आहे. हे डिवाइस गैस मुळे होनारी दुर्घटना कमी करते.प्रत्येक उपभोगत्याने ते लावणे फ़ायद्याचे होईल.
यावेळी प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे, स्टाफ क्लब चे अध्यक्ष प्रा. श्रीनिवास रायडू, सूर्याचे सागर बागडे सहित मोठया संख्येत प्राध्यापक व कर्मचारी उपस्तित होते. प्रस्तावना प्रा. श्रीनिवास रायडू , संचालन व आभार डॉ.शिल्पा आष्टनकर यानी केले.