वनामती, नागपूर येथील परिविक्षाधीन अधिकारी…
विद्यार्थ्यांच्या मनातील शंकेला स्वानुभवातून मार्गदर्शन…
नरखेड – अतुल दंढारे
जि.प.स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यास केंद्र, काटोल येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSP) उत्तीर्ण झालेल्या २८ अधिकाऱ्यांचे वनामती, नागपूर येथे ‘एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम’ अंतर्गत प्रशिक्षण सुरू आहे. त्यांनी ‘क्षेत्रभेट अभ्यासदौरा’ म्हणून जि.प.अभ्यासकेंद्राला भेट दिली. काटोल सारख्या ग्रामीण भागात सर्व सोईयुक्त अद्यावत अभ्यास केंद्र असल्याचे कौतुक केले.असे केंद्र प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असायला हवे असे मत वनामती प्रशिक्षण समन्वयक विश्वास पांडे यांनी व्यक्त केले.
यावेळी, २८ अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेबाबत मार्गदर्शन केले.तसेच विद्यार्थ्यांच्या मनात असलेल्या प्रश्नाला स्वतःच्या अनुभवातून उत्तरे दिली.व स्पर्धा परिक्षेबाबत सकारात्मक तयारीचा संदेश दिला.आपण स्पर्धा परीक्षेत यश संपादन करू शकतो का ? हे तीन महिन्यात कळते.तेव्हा स्वतःच्या ध्येयावर आरूढ होऊन यश संपादन करण्याकरिता अभ्यासात नियोजनपूर्वक सातत्य ठेवा.असा सल्ला युवा अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
वनामती प्रशिक्षण समन्वयक विश्वास पांडे यांचा शाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केंद्रसमन्वयक एकनाथ खजुरीया व उपक्रम संयोजक राजेंद्र टेकाडे यांचे शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी सहा.राज्य कर आयुक्त महेश हरिश्चंद्रे,गट विकास अधिकारी आत्मज मोरे, गट विकास अधिकारी स्नेहल शेलार,मुख्याधिकारी सोनाली म्हात्रे, पोलीस उपअधीक्षक श्रद्धा चव्हाण, उपशिक्षणाधिकारी सुरज बिस्किटे,
उपशिक्षणाधिकारी धनंजय मेंघाणे,उपशिक्षणाधिकारी दर्शन मेहता, उपशिक्षणाधिकारी वैभव सराठे, उपशिक्षणाधिकारी प्रदीप चव्हाण, उपशिक्षणाधिकारी शारदा साठोने,उपशिक्षणाधिकारी प्रशांत इखार, उपशिक्षणाधिकारी शुभम गायकवाड, उपशिक्षणाधिकारी स्नेहल रामटेके, उपशिक्षणाधिकारी स्वप्निल निकम,उपशिक्षणाधिकारी राजश्री तेराणी,उपशिक्षणाधिकारी राहुल पाटील,उपशिक्षणाधिकारी अश्विनी नेमाडे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन केंद्रसमन्वयक राजेंद्र टेकाडे तर आभार प्रदर्शन केंद्रसमन्वयक एकनाथ खजुरीया यांनी केले.