‘स्पर्धात्मक परीक्षा कक्ष’कृषि महाविद्यालय अकोला चा उपक्रम!
अकोला – संतोषकुमार गवई
कृषि विषयक शिक्षणक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासक्रमासह आपले आवडी नुसार स्पर्धात्मक परीक्षाकरीता योग्य पाठबळ मिळावे या उद्देशाने कुलगुरू डॉ. शरद गडाख यांचे संकल्पनेतून स्पर्धात्मक परीक्षा फोरम स्थापन करण्यात आला असून यां अंतर्गत कृषि महाविद्यालय अकोला द्वारे ‘स्पर्धात्मक परीक्षा कक्ष’ स्थापन करण्यात आला आहॆ.
स्पर्धा परीक्षा विशेषतः भारतीय कृषि अनुसंधान परिषदे अंतर्गत कृषि वैज्ञानिक (आई आर एस), राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट), एम. एस्सी – पीएचडी आदी मध्ये अकोला कृषि विद्यापीठाचे प्राबल्ल्य रहावे आणि या विद्यापीठातून शिक्षित झालेले अधिकाधिक पदवीधर शेती क्षेत्रातच रहावे भूमिकेतून सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र गाडे यांचे प्रयत्नातून मुळत: नागपूर कृषि महाविद्यालयातूनच बी.एससी, एम एस सी . आणि नंतर आय ए आर आय नवी दिल्ली येथून पीएच. डी असलेले व सध्या झाशी येथील राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्यापीठात विभाग प्रमुख म्ह्णून सेवारत असलेले प्रा.डॉ प्रशांत जांभुळकर, यांनी कृषी महाविद्यालय अकोला च्या विद्यार्थ्यांसाठी “ऑपॉर्च्युनिटीज अँड हाऊ टू क्रॅक आय सी ए आर अँड अदर एक्झामिनेशन” या विषयावर विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी त्यांना येणाऱ्या अडचणी आणि शंका याबाबत सविस्तर चर्चा केली.
कृषि महाविद्यालय अकोलाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र गाडे, अकोला यांचे अध्यक्षतेत उपस्थीतित संपन्न झालेल्या या अतिशय महत्वाकांक्षी कार्यक्रमाचे प्रसंगी कृषि महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद तथा विद्यार्थी- विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. सदर मार्गदर्शन तासिकेचे आयोजनासाठी प्रा डॉ. गिरीष जेऊघाले, डॉ. गणेश भगत, डॉ. दिलीप धुळे, डॉ. प्रेरणा चिकटे आदींनी परिश्रम घेतले.