अमरावती – दुर्वास रोकडे
शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या लक्षात घेता त्यांचा शेती मशागतीवरील खर्च कमी व्हावा, यादृष्टीने शेत बांधावर प्रयोगशाळा स्थापन करून अल्प खर्चात शेतातच नैसर्गिक खते व औषधे तयार करण्याचे तसेच ग्रामीण भागातच रोजगार निर्मितीचे तंत्रज्ञान विकसित करण्याचा कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचा मानस आहे.
शेतकऱ्यांपर्यंत ही कल्पना पोहोचविण्यासाठी येत्या रविवारी (दि. 4 ऑगस्ट) दुपारी 1 वाजता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी प्रशिक्षण केंद्र. शिवाजी कृषि महाविद्यालय, वेलकम पॉईंटजवळ, मोर्शी रोड, अमरावती येथे ‘शेतातच नैसर्गिक खते व औषधे तयार करणे’ या विषयावर मार्गदर्शन शिबीर आयोजित केले आहे.
या शिबीरात उपरोक्त विषयातील संशोधकांव्दारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या मार्गदर्शन शिबीराचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनव्दारे करण्यात आले आहे.