सांगली – ज्योती मोरे.
राज्यात शिवसेना-भाजपाचे सरकार आल्यावर सांगली चे पालकमंत्री होण्याचा मान जिल्ह्याचे सुपुत्र मा. सुरेश खाडे यांना मिळाला परंतू या अगोदरच्या पालकमंत्र्यांनी शिवसेनेला जी वागणूक दिली. तोच कित्ता भाऊंनी गिरवला असे वाटते. विषय समित्यांची, जिल्हास्तरीय समित्यांची यादी राज्यात ठरलेल्या युतीच्या फॉर्म्युल्याप्रमाणे शिवसेनेकडून घेण्यात आली.
संजय गांधी निराधार योजना समितीची नावे सोडून इतर विषय समितीवर शिवसेनेकडून ३८ नावे पाठवण्यात आली होती. सदरची नावे ही संपूर्ण जिल्ह्यातून जिल्हाप्रमुखांनी दिली होती. फॉर्म्युल्याप्रमाणे ६० टक्के भाजप आणि ४०% शिवसेना असे असताना एकाही कमिटीचे अध्यक्षपद सेनेकडे नाही.
या उलट दिलेल्या ३० नावांमधील ११ नांवे गहाळ करुन फक्त २७ नांवाचा कमिटीमध्ये समावेश केला गेला आहे. याला युतीधर्म कसा म्हणायचा? सांगली जिल्ह्यासाठी युतीचा फॉर्म्युला वेगळा आहे का? असा प्रश्न यावेळी उपस्थित होतो आहे.
यावर आम्ही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचेकडे रितसर दाद मागूच परंतू पालकमंत्र्यांनी तात्काळ यावर लक्ष घालून दुरुस्ती करावी अशी मागणी महेंद्र चंडाळे व आनंदराव पवार यांनी केली आहे.
यावेळी उपजिल्हाप्रमुख नंदकिशोर नीळकंठ, वाळवा तालुका प्रमुख सागर मालगुंडे, मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख समीर लालबेग, संदीप ताटे सांगली शहर प्रमुख, धर्मेंद्र कोळी शहरसंघटक सांगली, सारंग पवार वैद्यकीय मदत कक्ष शहर प्रमुख आणि शिवसैनिक उपस्थित होते..