GT vs CSK : शुभमन गिलच्या शानदार अर्धशतकाच्या बळावर गुजरात टायटन्सने आयपीएलच्या 16 व्या मोसमातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा पाच गडी राखून पराभव केला. या सामन्यात कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नई सुपर किंग्जने 20 षटकात 7 विकेट गमावत 178 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातने 19.2 षटकांत 5 बाद 182 धावा करत सामना जिंकला. रशीद खानला तीन चेंडूत 10 धावा आणि दोन विकेट्स घेतल्याबद्दल सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
शुभमन गिलने 36 चेंडूत 63 धावा करत गुजरातला विजयाच्या जवळ नेले. त्याने आपल्या खेळीत सहा चौकार आणि तीन षटकार मारले. विजय शंकरने 21 चेंडूत 27 धावा, रिद्धिमान साहाने 21 चेंडूत 25 धावा आणि साई सुदर्शनने 17 चेंडूत 22 धावा केल्या. कर्णधार हार्दिक पंड्या आठ धावा करून बाद झाला. राहुल तेवतियाने 14 चेंडूत 15 आणि रशीद खानने तीन चेंडूत 10 धावा केल्या. चेन्नईकडून राजवर्धन हंगरगेकरने तीन बळी घेतले. त्याचवेळी रवींद्र जडेजा आणि तुषार देशपांडे यांना प्रत्येकी एक यश मिळाले.
चेन्नईकडून गायकवाडने सर्वाधिक धावा केल्या
चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 92 धावा केल्या. त्याच्याशिवाय मोईन अलीने २३ धावांची खेळी केली. धोनीने अखेरच्या षटकात एक चौकार आणि एक षटकार ठोकत संघाची धावसंख्या सात बाद १७८ पर्यंत नेली. त्याने सात चेंडूत 14 धावा केल्या. गुजरातकडून राशिद खान, अलझारी जोसेफ आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी दोन बळी घेतले. त्याचवेळी जोशुआ लिटलला एक विकेट मिळाली.