मुंबई – गणेश तळेकर
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते,अंबादास दानवे यांनी आमरण उपोषणाच्या पहिल्याच दिवशी दूरध्वनी वरून संपर्क साधून ताई तुमच्या मागण्या रास्त असून,आम्ही यावर योग्य ते करू, परंतु तुम्ही तुमच्या तब्यतीची काळजी घ्यावी..तसेच त्यांनी चर्चा करण्याचे दिले आश्वासन पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या १० वर्षांपासून शीतल करदेकर यांचा लढा सुरू आहे.
बुधवार दि.१०जुलै २०२४ पासून आझाद मैदान,मुंबई येथे शीतल करदेकर यांचे आमरण उपोषण सुरू आहे.त्या अनुषंगाने विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेट्टीवार यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून तब्बेतीची विचारपूस करून काळजी घेण्याची विनंती केली. तसेच माध्यमकर्मिंसाठी महामंडळ व्हावे ही आमची इच्छा आहे आणि यासंदर्भात चर्चा करू असे आश्वासन दिले.तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे व महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे जनरल कृष्णा भोयर यांनी उपोषण स्थळी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला.
आझाद मैदानावर मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया च्या वतीने सुरू असलेल्या शीतलताईं च्या आमरण उपोषणास माईचे संस्थापक सरचिटणीस डॉ.सुभाष सामंत,मुंबई संघटन सचिव सचिन चिटणीस,सहकोषाध्यक्ष चेतन काशीकर,संस्थापक सदस्य शेखर धोंगडे,डाॅ अब्दुल कदीर, लक्ष्मिकांत घोणसे पाटील, सुनील कटेकर,प्रवीण वाघमारे,गणेश तळेकर,अनिल चासकर,पराग सारंग,भुपेश कुंभार,भूषण मांजरेकर,विवेक कांबळे, चंद्रशेखर पाटील,दीपक चिंदरकर,यांच्यासह अनेक सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते.