अमरावती – दुर्वास रोकडे
लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.