रामटेक – राजू कापसे
संविधान दिनानिमित्त शनिवारी सकाळी 10 वाजता शहरातील डॉ.आंबेडकर चौकात असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळा परिसरात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला परिवर्तन मंच, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, प्रहार संघटना, मैत्री ग्रुप, भीमसंग्राम सेना यांच्या संयुक्त विद्यमाने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन झाले. बाबासाहेबांनी संविधान निर्मितीत दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष रमेश कारामोरे म्हणाले की, ओबीसी, अनु. जाती, जमाती, आदिवासी इ. जात, धर्म, पंथ यांच्या आधारावर विभाजन टाळून बहुजन समाजाची संकल्पना बळकट केली पाहिजे. माजी नगराध्यक्षा सौ.शोभा राऊत, मैत्री ग्रुपच्या अलका मेश्राम, अंनिसच्या दीपा चव्हाण यांनीही संबोधित केले. प्रस्तावाचे वाचन व कार्यक्रमाचे संचालन प्रहारचे तहसील अध्यक्ष प्रयास ठवरे यांनी केले.
कार्यक्रमात परिवर्तन मंचचे राहुल जोहरे, वेणुधर भीमटे, भाऊराव भिलावे, दिनेश मून, गौतम पौनीकर, प्रमोद पाटील, राजेंद्र कांबळे,अंनिसच्या रामटेक शाखा कार्यध्यक्षा दिपा चव्हाण,प्रधिन सचिव शुभा थुलकर,अर्चना वाघमारे,सरला नाईक, शोभा राउत,आम्रपाली भिवगडे,गंगा टेंभुर्णे,प्रयिस ठवरे उपस्थित होते.याचप्रमाणे भिमसंग्राम सेनेचे जिल्हाध्यक्ष भागवत सहारे,मैत्री ग्रूपच्या अलका मेश्राम,कल्पना जोहरे,वैशाली बांगर, अलका प्रकाश मेश्राम,भारती गजभिये,विद्या सातपुते,जयश्री धुर्वे,अनिता जनबंधू सहित सामाजिक कार्यकर्ते,आंबेडकरवादी अनुयायी उपस्थित होते.