कोल्हापूर – राजेंद्र ढाले
उजळाईवाडी महामार्ग पोलिसांच्या वतीने चालक दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे चालक व महामार्गावरील चालकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी वाहन चालकांना वाहतूक नियमाबाबत मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सीबी शेडगे यांनी मार्गदर्शन करून वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे अपघात कमी करण्यासाठी आवश्यक असल्याचे सांगत स्व.बाळासाहेब ठाकरेअपघात विमा योजनेची माहितीही त्यांनी दिली.
महामार्ग पोलीस मदत केंद्र, उजळाईवाडी यांचेकडून चालक दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ व महामार्गावरील चालकांचा फेटे, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करीत त्यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक कुलवंत सारंगल,
पुणे प्रादेशिक विभागाच्या पोलीस अधीक्षक लता फड , पोलीस उपाधीक्षक प्रितम यावलकर , कोल्हापूर विभागाच्या महामार्ग पोलीस निरीक्षक प्रीती शिंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक कविता नाईक, पोलीस उपनिरीक्षक सुनील माळगे, चंद्रकांत पाटील, चालक व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.