Monday, December 23, 2024
Homeविविधमेरे प्यारे, सुंदर भारतको किसीकी नजर ना लगे…राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 54...

मेरे प्यारे, सुंदर भारतको किसीकी नजर ना लगे…राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 54 व्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम…

मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला स्मृतीदिन

तालुका प्रतिनिधी: (रामटेक) आज दिनांक 24 ऑक्टोबर 2022 रोजी बालोद्यान येथील प्रार्थना मंदिरात राष्ट्रसंतांच्या भजनांचा व मान्यवरांच्या प्रबोधनाचा तसेच गोपालकाल्याचे किर्तनाचे आयोजन श्री गुरुदेव सेवा मंडळ, रामटेकच्या वतीने करण्यात आले.

नरकचतुर्दशीच्या दिवशी रामटेक येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची फुले आणली गेली होती त्याचे स्मरण म्हणून या दिवशी दरवर्षी कार्यक्रम आयोजित केला जातो. कार्यक्रम आमदार,आशिष जयस्वाल,माजी आमदार आनंदराव देशमुख, माजी नगराध्यक्ष नलिनी चौधरी, माजी नगरसेवक दामोदर धोपटे, रामटेक तालुका समतादूत राजेश राठोड,ह.भ.प.कलावती पडोळे, काशिनाथ राठोड, कमलाकर लेंडे,शाहिर वसंत दुंडे यांच्या उपस्थितीत पार पडला.पाहुण्यांचे स्वागत पुषपमाला व ग्रामगीता ग्रंथ देऊन करण्यात आले.

तरूणाईला संतोपदेशाच्या मार्गात आणण्यासाठी आपण कमी पडत असल्याची खंत असून युवकांना सदर कार्यात समाविष्ट करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे समतादूत राजेश राठोड यांनी सांगितले. राष्ट्रसंताचे खंजिरी व साहित्य हेच त्यांचे उपदेशाचे साधन असून त्यांनी अंधश्रद्धा व जातीभेद यावर कडाडून प्रहार केला आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामगीताचार्य कांचनमाला माकडे यांनी केले. गोपालकाल्याचे किर्तन ह.भ.प.पांडुरंग महाराज शेंडे,अडेगाव यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

श्री गुरूदेव सेवा मंडळाचे सुरेश तुरक, सुधाकर मोहोड,श्रीधर पुंड, मोरेश्वर माकडे,सुनंदा जांभुळकर,एकनाथ ऊईके,मधुकर कुर्वे,राजू देशमुख, धनराज महाजन, सचिन भिलकर,विक्की पुंड, महेश सोरते,करण कटुकाडे,नंदु नेरकर,राजु मेंघरे,अनुज पुंड,अनिल मिरासे, मनोहर वांढरे,आनंद नंदनवार,मनोहर बावणकुळे,मनोहर माकडे उपस्थित होते. हार्मोनियम वादक सोहम महाजन, तबला वादक प्रसाद महाजन यांनी अप्रतिम गीतांना साथ दिली.’सबके लिए खुला है मंदिर ये हमारा’..आते है नाथ हमारे … स्वातंत्र्यकालीन प्रबोधन गीत, या भारतात बंधूभाव नित्य वसू दे…विद्यापिठ गीत,कधी वाजेल ही खंजिरी… मेरे प्यारे सुंदर भारतको किसीकी नजर ना लगे…अश्या सुश्राव्य गीतांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध व अंतर्मुख केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: