Monday, December 23, 2024
Homeराज्यशिवजयंती निमीत्य पारशिवनीत महारक्तदान शिबीर...४८ जणांनी केले रक्तदान

शिवजयंती निमीत्य पारशिवनीत महारक्तदान शिबीर…४८ जणांनी केले रक्तदान

राजु कापसे
रामटेक

पारशिवनी येथे शिवजयंतीनिमीत्य महारक्तदान शिबीर आयोजीत करण्यात आलेले होते. यावेळी हिंदु व मुस्लीम बांधीलकच्या एकोप्याचे रक्तदान शिबीर असल्याचे मत डाॅ. इरफान अहमद यांनी व्यक्त केले. याप्रसंगी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्याच्याच्यावतीने रक्तपेढीचे आयोजन करण्यात आले होते. 

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रक्त संकलन अधिकारी डॉ.पल्ववी मॅडम, अधीक्षक परिचारिका भगत मॅडम यांनी या रक्तदान शिबीरात महत्वाची भुमीका बजावली. या रक्तदान शिबीरात 48 जणांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबीराचे आयोजन युवा मित्र मंडळ पारशिवनी, मानव एकता मंच पारशिवनी, पाऊलवाट फाऊंडेशन पारशिवनी , ऋणानुबंध फाऊंडेशन पारशिवनीच्या वतीने करण्यात आले होते.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ. इरफान अहमद हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून, नगरपंचायतच्या नगराध्यक्षा प्रतिभा कुंभलकर, नगरसेवक अनिता भड, खुशाल कापसे, राजेश गोमकाळे, गोपाल कडू, अरविंद दूनेदार, रामटेक लोकसभा महासचिव मोहम्मद अफरोज खान, दिपक शिवरकर, रोशन पिंपळामुळे, सामाजिक कार्यकर्ता अज्जू भाई पठाण, अमित यादव,राहुल ढगे, प्रेम भोंडेकर, रविन्द्र तरार,प्रामुख्याने उपस्थीत होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: