सांगली – ज्योती मोरे.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आयोजित सतराव्या कामगार साहित्य संमेलनास आज मिरजमध्ये ग्रंथ दिंडीने सुरुवात करण्यात आली. कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत ग्रंथ दिंडीस सुरुवात झाली. सदर ग्रंथ दिंडी शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली, यामध्ये अनेक मान्यवरांसह साहित्यिक कामगार मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.