Thursday, September 19, 2024
Homeखेळमहागाव (बु) येथील भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे माजी आमदार दिपकदादा आत्राम...

महागाव (बु) येथील भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते बक्षीस वितरण…

गॉड लाईक क्रिकेट क्लब महागाव (बु) मंडळाकडून भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे आयोजन. अहेरी तालुक्यातील महागाव (बु) येथे गॉड लाईक क्रिकेट क्लब मंडळा कडून भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. या सामन्यासाठी द्वितीय पुरस्कार भारत राष्ट्र समिती चे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्याकडून ठेवण्यात आले होते. विजयी संघांना पुरस्कार माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते देण्यात आले.

याबक्षीस वितरणाच्या वेळी माजी सरपंच श्रीनिवास आलाम, वेलगुर उपसरपंच उमेशभाऊ मोहूर्ले,ग्राप सदस्य गणेश चौधरी, राजेश दुर्गे,अमर गर्गम,प्रमोद रामटेके,ग्राप सदस्या सोनूताई गर्गम,ग्राप सदस्या संगीताताई आत्राम,ग्राप सदस्या वंदनाताई दुर्गे,माजी सरपंच मधुकर आत्राम,सूरज बाला, गौतम गर्गम,गणेश दुर्गे,अभिशेख गर्गम,प्रवीण दुर्गे,जुलेख शेख,विनोद कावेरी, मिलिंद अलोने,सह गावकरी व आविस पदाधिकारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: