Sunday, December 22, 2024
Homeराजकीयरामटेक विधानसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत ग्रामस्थांचा भव्य पक्ष प्रवेश...

रामटेक विधानसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत ग्रामस्थांचा भव्य पक्ष प्रवेश…

रामटेक – राजु कापसे

रामटेक विधानसभा क्षेत्रातील आदिवासी बहुल क्षेत्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे रामटेक तालुका अध्यक्ष श्री. शेखर दुंडे यांचे असलेले सामाजिक क्षेत्रातील कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत हिवरा बाजार, वरघाट, तुमरीटोला, ढुमरीटोला या गट ग्रामपंचायत असलेल्या गावातील असंख्य पुरूष व महिला तथा युवक ग्रामस्थांनी भव्य पक्षप्रवेश करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा झेंडा हाती घेतलेला आहे.

हा पक्षप्रवेश श्री. शेखर दुंडे यांचे अध्यक्षतेखाली होत पक्षात संजय बाविस्ताले, चिरंजीव वाघमारे, फुलचंद उईके, फुलबाद सरशाम, राजेश सलामे, मनोज इनवाते, रमेश इनवाते, विलास केळवदे, नंदकिशोर उइके, राजकुमार उईके, शेषराव कोडवते, उदल कुंमरे, देवाकर कोरवाडे, समावंती टेकाम, संगिता कोकोडे, इंद्रावती वरखडे, चरणदास बामबदरे, राकुळाबाई कुंभरे, मुन्नीबाई सरशाम, या प्रमुख गावकऱ्यांचा समावेश होता तसेच पक्षाचे असंख्य पदाधिकारी सदर वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: