सुप्रसिद्ध इंटरनॅशनल मेकअप आर्टीस्ट मिनल पाचकवडे यांची विशेष उपस्थिती…
अमरावती येथील हॉटेल रेलीश रेसीडेंन्सी मध्ये शनिवार (ता.19) वन डे मेकअप ॲन्ड टॅलेंन्ट शो सेमीनारचे आयोजन केले असुन या कार्यक्रमात अकोल्यातील निशा मेकओव्हर्सच्या संचालिका सुप्रसिद्ध इंटरनॅशनल मेकअप आर्टीस्ट सौ. मिनल पाचकवडे विशेष अतिथी म्हणुन उपस्थित राहणार आहेत.
अमरावती येथील सुप्रसिद्ध मेकअप आर्टीस्ट सावी वासनिक यांनी या वन डे मेकअप ॲन्ड टॅलेंन्ट शो सेमीनारचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध इंटरनॅशनल मेकअप आर्टीस्ट वैशाली कडू, इंटरनॅशनल हेअर स्टाईलीस्ट विनोद सर, इंटरनॅशनल मेकअप आर्टीस्ट अर्चना राठोड, ॲक्टर ॲन्ड मॉडेल इशान्य भोयर, निशांत शंभरकर,
जयश्री सोळंके उपस्थित राहणार आहेत. या सेमीनारमध्ये अकोल्यातील निशा मेकओव्हर्सच्या संचालिका सुप्रसिद्ध इंटरनॅशनल मेकअप आर्टीस्ट सौ. मिनल पाचकवडे विशेष अतिथी म्हणुन उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत.
या सेमीनारमध्ये मेकअप कॉम्पीटीशन, फॅशन शो, डान्स, परफॉरमन्स ॲन्ड ॲवार्ड शो होणार असुन विदर्भातील ब्युटीशियनकडून शोसाठी उर्स्फुंत सहभागी नोंदविण्या येईल, असा विश्वास आयोजक सावी वासनिक यांनी व्यक्त केला आहे.