खामगाव – हेमंत जाधव
मातंग समाजाच्या विविध मागण्या मंजूर होण्याच्या दृष्टीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार दि.११/१२/२०२३ रोजी उपविभागिय अधिकारी कार्यालयावर मातंग समाजाच्या पारंपारीक वाद्यासह साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरम युवा आघाडी तर्फे भव्य निनाद मोर्चाचे आयोजन करण्यात आल़े आहे.
सदर मोर्चा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे बुलढाणा जिल्हा उत्तर युवा आघाडी अध्यक्ष कृष्णा नाटेकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दि. ११/१२/२०२३ रोजी दुपारी १२-३० वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर न.प. मैदान खामगांव येथून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून डफडे चौघडा ब्रास बँड आदी पारंपारीक वाद्यासह भव्य निनाद मोर्चाला सुरुवात करण्यात येणार आहे.
सदर मोर्चा शहराच्या मुख्य रस्त्याने उपविभागीय अधिकारी कार्यालय खामगाव येथे जावून अ.जा.च्या आरक्षणाचे अ.ब.क.ड वर्गीकरण करण्यात यावे,क्रांतिवीर लहूजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या शिफारशी लागू करून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे चिराग नगरी मुंबई येथील आणि क्रांतिविर लहूजी साळवे यांचे संगमवाडी पुणे येथील स्मारक उभारण्यात यावे,
अ.ब.क.ड. वर्गीकरणा करिता शहीद झालेल्या स्व.अंकुश खंदारे यांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, डिजेवर तात्काळ बंदी घालण्यात यावी, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळा अंतर्गत एन.एस.एफ.डी.सी. योजना पुर्ववत सुरू करण्यात यावी, दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजने करिता निधी वाढवून देण्यात यावा,
खामगाव न.पा. हद्दीत शासनातर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात यावे, डफडे चौघडा व बॅन्ड कलावंतांना वृध्दकलावंत पेंशन योजने मार्फत मानधन देण्यात यावे, ग्रामीण भागा प्रमाणे शहरातील लाभार्थ्यांना शासकिय भुखंडावर रमाई आवास योजनेचे घरकुल बांधून देण्यात यावे,
शिधा पत्रिका असून सुध्दा शासकीय योजनेचे धान्य मिळत नाही अशा गरिब कुटूंबांना धान्याचा लाभ देण्यात यावा, आदींसह अनेक मागण्यांचे निवेदन शासनाला सादर करण्यात येईल करिता मातंग समाज बंधू भगिनी पारंपरिक वाद्ये कलावंतांनी आपाल्या कडील वाद्यासह मोर्चा मध्ये बहूसंखेने उपस्थित रहावे असे आवाहन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे खामगांव ता.अध्यक्ष उमेश बाभुळकर व शहर अध्यक्ष सुधाकर वानखडे यांनी केले.