Sunday, December 22, 2024
Homeखेळरामटेक येथे भव्य मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात साजरी…महसुल विभागातर्फे आयोजन...

रामटेक येथे भव्य मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात साजरी…महसुल विभागातर्फे आयोजन…

रामटेक -: ( तालुका प्रतिनिधी )

आजादीच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त महसूल विभाग रामटेक उपविभागीय अधिकारी सह तहसील कार्यालय रामटेक च्या वतीने भव्य दौड स्पर्धेचे आयोजन आज दिनांक १२ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. यावेळी प्रामुख्याने आमदार आशिष जयस्वाल, एस.डी.ओ. वंदना सवरंगपते, तहसिलदार बाळासाहेब मस्के, पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर हे उपस्थित होते.

सकाळी ८ वाजेपासून मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. दरम्यान चार गटांमध्ये मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. मॅरेथॉन स्पर्धेत मुलं मुली वरिष्ठ नागरिक अपंग मिळून २०० च्यावर धावपटुनही सहभाग घेतला होता. त्यात प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या धावपटुंना पारीतोषीक तथा प्रमाणपत्र देण्यात आले. यामध्ये पुरुष गटामध्ये विक्की राऊत, राकेश भांडारकर, विकृम राऊत हे विजयी ठरले तर महिला गटामध्ये कल्याणी डोंगे, विजयश्री हटवार, सोनिया बदन या विजयी ठरल्या तर वरिष्ठ नागरिक गटामध्ये रविंद्र नारनवरे, ऋषिकेश किंमतकर, प्रमोद मुळे यांचा समावेश होता.

त्यांना पारीतोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले तसेच लहान मुला – मुलींमध्ये संस्कार पाचभाई, स्पर्श टेंभुर्णे, पियुष दिवटे, श्रेयस मोरे हे विजयी ठरले तर दिव्यांग गट मध्ये करण निंबुरकर, संकेत निंबुरकर, अंजली बगडे हे विजयी ठरले याही सर्वांना पारितोषीक तथा प्रमाणपत्र देण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिश जाधव पुरवठा निरीक्षक यांनी केले तर आभार प्रदर्शन सारिका धाञक यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान आमदार एड आशिषजी जयस्वाल यांनी भुषविले. सहयोगी तहसील डिपार्टमेंटचे कर्मचारी अधिकारी पोलीस डिपार्टमेंटचे कर्मचारी अधिकारी सोबतच वाइल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन सर्पमित्र प्राणी मित्र संस्था रामटेक सृष्टी सौंदर्य संस्था रामटेक बेटी बचाव बेटी पढाव कराटे ग्रुप रामटेक आदित्य सोसायटी रामटेक यांच्या सहकार्याने ही मॅरेथॉन पार पडली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: