रामटेक – राजु कापसे
दिनांक २७/२/२०२४ रोज मंगळवारला पर्यटन स्थळ खिंडसी बोटिंग सेंटर येथे सौ. संध्याताई चंद्रपालजी चौकसे (संस्थापिका रामधाम) व श्री. चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान रामधाम व समस्त चंद्रपाल चौकसे मित्र परिवाराच्या वतीने सामाजिक बांधिलकीची जाणीव लक्षात घेऊन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य महिला मेळावा व माता भगिनींचे हळदीकुंकू कार्यक्रम पार पडले.
कार्यक्रमाचे उदघाटन रामटेक विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते श्री. चंद्रपाल चौकसे (अध्यक्ष, राष्ट्रीय पंचायती राज ग्रामप्रधान सरपंच संघटन महाराष्ट्र राज्य / पर्यटक मित्र रामटेक), सौ. संध्याताई चंद्रपालजी चौकसे (संस्थापिका रामधाम) यांनी केले कार्यक्रमात रामटेक तहसील व खिडसी परिसरातील समस्त ग्रामीण क्षेत्रातील बोरी, पंचाळा, मांद्री, गुगुलडोह,
घोटी, लोहारा, महादूला, भंडारबोडी, शिवनी भोंडकी, नवरगाव, संग्रामपूर, शिरपूर, भोजापुर, मानापुर, ई. व खिंडसी जलाशय परिसरातील समस्त गावातील अंदाजे 5000 महिलांनी उस्फूर्तपणे सहभाग घेऊन कार्यक्रमात उखाणे स्पर्धा, संगीत खुर्ची, सोबत सुरुची भोजन व रेन डान्स, बोटिंगचा आनंद घेतला.
यावेळी सौ. सुनीताताई रमेशजी मिसार (सरपंच भंडारबोडी), सौ. ज्योतीताई ठाकरे (सरपंच नवरगाव), सौ. प्रगतीताई माटे (सरपंच पंचाळा), सौ. अश्विनीताई गुरव (CRP महादुला), सौ. टीनाताई वडीचार (CRP पंचाळा), सौ. लक्ष्मी देशमुख (CRP पिंडकापार सोन.), श्री. मोहन कोठेकर, श्री. महेंद्र दिवटे, श्री. विजु गोपीचंदजी तुपट,
सौ. रीनाताई तायवाडे, सौ. सुनीता भांडारकर, सौ. करिष्मा मानकर, सौ. बडवाईक ताई, सौ. अंजीरा म्हात्रे, सौ. शांताबाई शेंडे, सौ. देवकाबाई डडमल, सौ. वैशाली बागडे, सौ. संगीताताई शिवरकर, सौ. दक्षिणा गजभिये, करिष्माताई आंबीलढुके, मोनाली ठाकरे, विनिता नागोसे, लक्ष्मी कामठे, लता कामठे, नेहा तरारे, प्रभा कामठे, सुमन चौधरी,
भारती चौधरी, प्रभा ठाकरे, रंजना तुपट, रुपमा मासुरकर, चित्ररेखा धुर्वे, उषा रामकेरकर, प्रमिला धुर्वे, वर्षा दियेवार, मनीषा वासनिक, मंगला नवघरे, शोभा धुर्वे, दीपा गजभिये, रंजना गजभिये, चंद्रकला रामकेरकर, कमला सहारे,
कीर्ती मेश्राम, माधुरी बुचे, सविता माटे, स्नेहा माटे, सुरेखा घोडमारे, नलिनी बागडे, गुंजन बागडे, नेहा पाटील, प्रियंका बाहे, अनुबाई चाचेरे, ममता बनकर, अनिता ठाकरे, रत्ना लांजेवार, रिता प्रभा व समस्त महिला भगिनी उपस्थित होत्या.