हिंदुराष्ट्र सेने कडून सर्व कावड यात्रांचे मोठ्या उत्साहात पूजन व स्वागत…
खामगाव – मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्या मध्ये गावोगावी हिंदुराष्ट्र सेनेचे सामाजिक कार्य उभे राहत असताना या वर्षी हिंदुराष्ट्र सेना खामगाव सुटाळपुरा यांच्या वतीने भव्य कावड यात्रा काढण्यात आली मोठ्या संखेत कार्यकर्ते हर, महादेव हर महादेव या जयकाऱ्या मध्ये तल्लीन झाले होते, त्याच बरोबर निघालेल्या सर्व कावड यात्रांचे स्वागत मोठ्या उत्साहात हिंदुराष्ट्र सेनेच्या वतीने करण्यात आले,
या वर्षी 14 ठिकाणी कावड यात्रा 9 ठिकाणी दहीहंडी उत्सव व येणाऱ्या काळात 134 ठिकाणी हिंदुराष्ट्र सेने कडून गणेश उत्सव साजरा करण्यात येणार आहे .या माध्यमातून हिंदू समाजाला जोडणे हिंदून मध्ये समता प्रस्थापित करून गोरक्षा करणे ,धर्मांतरण थांबवणे , लव्ह जिहाद थांबवणे व हिंदूंना आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्यासाठी मार्गदर्शन करणे हे कार्य हिंदुराष्ट्र सेना करते,
खामगाव येथे हिंदुराष्ट्र सेना जिल्हा प्रमुख विजय पवार, युवा जिल्हा प्रमुख सागर बेटवाल, संपर्क प्रमुख रवी माळवंदे , खामगांव शहर प्रमुख राजेश तांबटकार, सोनू चव्हाण ,आनंदसिंग चव्हाण ,तसेच कावडधारी बॉबी पंजाबी, दीपक घाईत,विक्की सारवान ,रितेश जैन ,महादेव कांबळे ,केलास शिंदे ,श्रेयस महाजन लक्ष्मण कान्हेरकर व सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते,