Sunday, December 22, 2024
Homeराज्यआज झाले भव्य रुद्राक्ष वाटप...

आज झाले भव्य रुद्राक्ष वाटप…

हेमंत जाधव

आज महाराष्ट्रातील एकमेव कुबेर मंदिर येथे झाले भव्य रुद्राक्ष वाटप…
असंख्य भाविकांनी घेतला लाभ…

आज बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील श्री धनकुबेर मंदिराचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्य १,११,१११ रुद्राक्षाचे वाटप होणार असल्याचे आवाहन मंदिराचे पिठाधिश श्री इंद्रदेव महाराज यांनी केले होते त्या निमित्य आज दसमावस्या चे दिवशी श्री कुबेर मंदिर खामगाव येथे सकाळी विविध आखाड्याचे व देवस्थान चे महामंडलेश्वर आणि संत महंत यांचे हस्ते मंदिराचे पिठाधिश श्री इंद्रदेव महाराज यांचे सप्त धान्य, गोमूत्र आदीं चे स्नान करून नंतर भस्मस्नान केले शुद्धी स्नान करून भगवान कुबेर, बालाजी आणि लक्ष्मीजी ची आरती करण्यात आली नंतर रुद्राक्ष अभिषेक आणि सिद्ध करून भाविकांना वाटप करण्यात आले यावेळी रुद्राक्ष मिळविण्यासाठी भाविकांची गर्दी जमली होती मंदिर प्रशासनाने रुद्राक्ष वाटपाची चोख व्यवस्था केली होती अगदी शांततेत रुद्राक्ष वाटप होऊन नंतर महाप्रसाद वितरित झाला यावेंकी भाविकांमध्ये रुद्राक्ष मिळाल्याचा आंनद प्रत्यक्ष दिसत होता.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: