Monday, December 23, 2024
Homeराजकीयग्रा.पं. शितलवाडी सरपंचपदी डाँ. सौ जयश्री पपीश मडावी...

ग्रा.पं. शितलवाडी सरपंचपदी डाँ. सौ जयश्री पपीश मडावी…

रामटेक – राजु कापसे

ग्रामपंचायत शितलवाडी येथे सरपंचपदी सुशिक्षीत उमेदवार म्हणुन डाँ. सौ. जयश्री पपीश मडावी ह्या मोठ्या मताधिक्क्याने निवडून आलेल्या आहेत. जयश्री ह्या गृहिनी असुन त्यांचे पती हे डॉक्टर आहेत.

ग्रामस्थांनी नवा चेहरा व तसेच सुशिक्षीत उमेदवार हा तालुक्यातील आर्थिक दृष्टीकोणातुन सधन असलेली ग्रामपंचायत शितलवाडी चा कारभार चांगल्या प्रकारे हाताळेल व विकास घडवुन आणेल असे मत डाँ. जयश्री मडावी यांनी व्यक्त केले. पैसा न पहाता नागरीकांनी माणसाची किंमत केली असल्याचे नवनियुक्त सरपंच जयश्री मडावी यांनी बोलतांना व्यक्त केले.

जयश्री ह्या सरपंचपदी तर त्यांच्या पॅनल मधील श्री प्रज्वल गेचुडे, सौ.नलीनी पराते, सौ वैशाली सावरकर, श्री किशोर सहारे, सौ. प्रभा देवडगले सौ दिशा बालपांडे हे उमेदवार सुद्धा सदस्य पदासाठी निवडुन आले असुन सरपंच जयश्री पपीश मडावी व त्यांच्या पॅनलमधील निवडुन आलेल्या समस्त सदस्यांनी नागरीकांचे आभार मानले आहे.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: