रामटेक – राजु कापसे
रामटेक पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या लोहडोगरी येथील पिण्याचा पाण्याचा विहिरीचे पाणी नीकासी होत नसल्याने पाणी खूप दिवसापासून जमा झाले आहे.त्यामुळे पाणी दूषित होऊन पाण्यात जंतू निर्माण झाले.लोहडोगरी ग्राम पंचायत ला ग्राम स्वच्छ्ता अभियान अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील दुसरे पारितोषिक मिळालेली ग्राम पंचायत आहे.
विहीर गावात असल्याकारणाने गावातील महिला पाणी पिण्यासाठी व दैनंदिन उपयोगात आणत असतात.विहीर चौकात असल्याने नागरिक सुद्धा विहीर सभोवताल येऊन बसत असतात.पण मागील काही दिवसापासून विहिरीचे वेस्ट पाणी बाहेर जात नसल्याने विहिरी सहभोवताल जमा झाले आहे.
पाण्यामधे चील,जंतू सहित मच्छर ठळक पने दिसून येतात.ग्राम पंचायत कार्यालय लोहडोगरी येथे गावातील नागरिकांनी तक्रार केली असता ग्राम पंचायत ने मनुष्यबळ कामी लावले,पण ते पाणी नीकासी करण्यात अपयशी ठरले. विहिरी भोवताल नागरिकांचे वास्तव्य असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहेत.त्यामुळे लवकरात लवकर ग्राम पंचायत ने यावर तोडगा काढावा अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.