Friday, November 22, 2024
Homeराजकीयमतदान करून लग्नाला यायच हं..! १८ डिसेंबरला विवाह मुहूर्ताबरोबर ग्रामपंचायत निवडणूक...

मतदान करून लग्नाला यायच हं..! १८ डिसेंबरला विवाह मुहूर्ताबरोबर ग्रामपंचायत निवडणूक…

अकोला – अमोल साबळे

ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. एकीकडे राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना दुसरीकडे मतदानाच्या दिवशीच १८ डिसेंबरला लग्नाची तारीख असल्याने वधू-वर पक्षाकडून लग्न पत्रिकेवर व सोशल मीडियावर “कृपया सकाळी लवकरात लवकर मतदान करून लग्नाला यायचं. अशी विनंती करण्यात येत आहे. नातेवाईक व राजकीय नेतेमंडळीला पेच पडला आहे.

आल्याने लग्नाची लगीनघाई सुरू यामुळे उमेदवारांसह, खंदे कार्यकर्ते, आहे. गावपातळीवर प्रत्येक दिवसाला स्थानिक स्तरावर वेगळीच घडामोड होत आहे. निवडणूक जिंकण्यासाठी अहोरात्र नियोजनाची तयारी सुरू आहे. मात्र दुसऱ्या बाजूला विवाह मुहूर्त जवळ लागणार आहे. मजुरांना मतदानासाठी गाव पाड्यावर आणणे, हा खर्च उमेदवाराला न परवडणारा असल्याने बरेच स्थलांतरित मजूर मतदानापासून उमेदवार वंचित राहण्याची शक्यता आहे.

मात्र मजूर स्थलांतराचा फटका नक्कीच ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालाला बसणार असून, बहुतेक उमेदवारांचे गणितही बिघडणार आहे. निवडणुका लागलेल्या गावांपैकी बरीच गावे, पाडे आदिवासीबहुल आहेत. येथे शंभर टक्के मोलमजुरी करणारी कुटुंबे आहेत. अशा गाव-पाड्यातील मतदारांना गावी आणण्यासाठी उमेदवारांची मोठी कसोटी ठरणार आहे. एकंदरीत लग्न सोहळा व स्थलांतरित मजुरांमुळे ग्रामपंचायत निवडणूक मतदानाची आकडेवारी कमी

उमेदवारांनी वधू-वर पक्षाकडे तारीख बदलण्याची आग्रही विनंती केली होती. मात्र नियोजन चुकू नये यासाठी १८ डिसेंबर वरच शिक्कामोर्तब झाला.प्रत्येक इच्छुक आपल्याला वॉर्डातून अधिक मते कसे मिळतील याचे गणित मांडत आहेत. गावत आदिवासी मजूर रोजगारानिमित्त परराज्यांत स्थलांतरित झाले आहेत.

या मजुरांची शोधाशोध उमेदवार करू लागले आहेत. गावांत निवडणूक आहे. पण स्थानिक मजूर ऊसतोडणी व इतर कामानिमित्त गुजरात, राज्यातील इतर जिल्ह्यात, मध्य प्रदेश व इतर भागात गेले आहेत. मजूर वस्त्यांमध्ये शुकशुकाट आहे. याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीत होण्याची शक्यता आहे. काहींना “आधी लग्न मतदानाचे मग वधू- वरांचे” अशी स्थिती मतदारांमध्ये निर्माण झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांना हळदीला पाच मिनिट का असेना आवश्यक उपस्थिती ठेवावी लागणार आहे. बहुतांश गावात सरपंच पदाच्या पराभूताचा झटका सुद्धा सहन करावा होण्याची दाट शक्यता आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: