मूर्तिजापूर प्रतिनिधी, नरेंद्र खवले.
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटना मुर्तिजापूर व बार्शिटाळली तालुकाच्या वतीने स्थानिक आमदार हरिष पिंपळे यांच्या घरासमोर धरणे आंदोलन केले व विविध प्रलंबित मागण्या संदर्भात आज ४ डिसेंबर रोजी निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्रातील सर्व संगणक परीचालकांचा आकृतीबंध समावेश करून वेतन महिन्याच्या निश्चित तारखेस देण्यात यावे. आकृतीबंधात समाविष्ठ करण्यास कालावधी लागत असल्यास किमान मासिक २० हजार पर्यंत वेतन सद्यस्थितीत देण्यात यावे. नियमबाह्य कामे लावताना संदर्भिय पत्रान्वये ग्रामविकास विभागाची पूर्व परवानगी घेऊन त्याचा वेगळा मोबदला देण्यात यावा. सद्यस्थितीत कामाच्या बाबतीत दिलेले टार्गेट सिस्टीम पूर्णपणे बंद करण्यात यावी. प्रलंबित मानधन तात्काळ देण्यात यावे आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत सध्या संपूर्ण महाराष्ट्रात संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन सुरू आहे.
मागण्याची पूर्तता न झाल्यास आगामी हिवाळी अधिवेशन नागपूर येथे दि. ११ डिसेंबर रोजी मोर्चा द्वारे धडक देण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद आहे. सदर निवेदन घेतल्या नंतर आमदार हरिष पिंपळे यांनी सांगितले की आपल्या मागन्या अतिशय रास्त असुन येत्या अधिवेशनात आपला प्रश्न निकाली कसा लागेल याकरिता ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या सोबत बैठक लावतो व आपला प्रश्न सोडवण्यासाठी सांगतो असे आश्र्वासन त्यांनी दिले. सदर निवेदन महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेचे जिल्हाउपाध्यक्ष अतुल आबुलकर, तालुका अध्यक्ष पंकज देशमुख, बार्शिटाकळी तालुका अध्यक्ष मनिष खिरेकर, इम्रान खान, उपाध्यक्ष शरद कळंब, सचिव अनुप इंगळे, सहसचिव रोशन ठोकळ यांच्या सह मुर्तिजापुर तालुक्यातील व बार्शिटाकळी तालुक्यातील शेकडो संगणक परिचालक यावेळी उपस्थित होते.